निरोप समारंभ..,..
*निरोप समारंभ*
काय बोलावे मला ते
आत्ता काहीच कळत नाही
तुमच्या आठवणींचा सूर्य
मनाआड का ढळत नाही
थोडा आनंदाचा आणि
थोडा क्षण हा दुःखाचा
इथून पुढचा प्रवास तुमचा
नक्कीच होईल सुखाचा
तुम्ही सोडून चाललात याचे
दुःख नक्कीच आहे मनी
मन गहिवरते आमचे अन
डोळे पाणावतात या क्षणी
तुमच्याविना जिवलग
आम्हा दुसरे कोणीच नसे
मनामनात उमटलेत
तुमच्या अस्तित्वाचे ठसे
भारावलेल्या मनाने आम्ही
आज निरोप देतो तुम्हास
फक्त हृदयात तुमच्या नेहमी
जागा असावी आम्हास
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या