C-60 commando...
*C-60 कमांडो*
C-60 कमांडो कोणाच्या
बापालाही नाही भीत
जगणं आणि मरण यातील
फक्त अंतर एक वीत
मरणाच्या दारात
छातीचा करतो कोट
कधी होते कत्तल तर
कधी भुसुरुंग स्फ़ोट
चित्यासारखे चपळ अन
वाघासारखे आहेत शूर
पर्वा नसते कधी त्यांना
नदी नाले की असो पूर
C-60 कमांडो म्हणजे
खरंतर जंगलचा बाप
नुसत्या नावानेच नक्षल्यांचा
उडतो थरकाप
खाण्यापिण्याची त्यांची
होते कितीच तरी अबाळ
जमीन त्यांचं अंथरून अन
पांघरून असतं आभाळ
तुडवीत काट्याकुट्याचा रस्ता
तो डोंगर दऱ्यातून धावतो
नक्षल्यांच्या योजनांना
असा भुसुरुंग लावतो
विरभोग्या वसुंधरा
मनात जपतो ब्रीद
कधीच नसतो घरी तो
दिवाळी असो की ईद
कित्येक सहकाऱ्यांनी इथे
लावली जीवाची बाजी
म्हणूनच प्राणाहूनही प्रिय आहे
मला C-60 कमांडो माझी
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
PSI अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो :- 8424043233
टिप्पण्या