आपली आई..


 आपली आई

अशी आहे आपली
शेवटचीच पिढी
ज्यांच्यापाशी आहे
आई भोळी भाबडी

ना तिचं अकॉउंट आहे 
कुठे सोसियल मीडियावर 
घरादारात वावरते ती 
साहवारी लुगड्यावर 

स्मार्टफोनचं लॉक ही साधं
तिला येत नाही उघडता 
धन्य झाले जीवन त्यांचे
अशा माऊलीचा सहवास घडता

कुठली ही तक्रार न करता 
ती जगते साधेपणात 
तिच्याबद्दल नेहमीच आहे
आदर आमच्या मनात 

स्वतःची जन्मतारीख ही
माहित नाही तिला
खरंच तो भाग्यवान आहे
अशी आई भेटली ज्याला
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक 
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:-8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत