संधी


 *संधी*


स्वतःच स्वतःला असं 

तू धरू नको वेठीस

संधी गेली तर काय झालं 

अनुभव तर आला पाठीस


पुढच्या वेळी मैदान

पूर्ण ताकदीने गाजव

अरे नावे ठेवणाऱ्यांना

तुझ्या कर्तृत्वाने लाजव


तुझ्या मनास झालेली ही 

असेल जखम जरी ताजी

आत्मविश्वासाच्या जोरावर

पलटवं हरलेली बाजी


परिस्थितीती पुढे असा

तू होऊ नकोस हतबल

जिथे कमी पडला तिथे

आणखी वाढव तुझं बल 


सध्या तरी नको मनात  

वाईट विचारांची गर्दी 

पुढच्या वेळी दिमाखात

मित्रा चढव अंगावर वर्दी


तेवढं एक मात्र तू

पक्क ठेव ध्यानात

एकदा हरल्याने आयुष्य 

संपवू नको क्षणात

✍️✍️✍️✍️✍️✍️

PSI अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

मो:- 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत