निरोप....
*निरोप*
नव्या नवरीसारखी आली
ती लेवून गुलाबी पदर
प्रत्येकाच्याच मनात होता
तिच्याबद्दल नितांत आदर
दिसायला एवढी सुरेख कि
बघताच क्षणी प्रेमात पडावं
तिच्याच बाबतीत असं का
हे विपरीत मग घडावं
कानामागून आली अन
झाली म्हणे ती तिखट
तिच्यामुळेच तर झाली
नोटबंदी सरसकट
पाचशे हजारच्या मानगुटीवर
तिनेच तर दिला पाय
तिचेच अस्तित्व धोक्यात
खरंच म्हणता कि काय
तीला पाहण्याचं कुतूहल
होत प्रत्येकाच्या मनी
तिच्याच मागे हातधुवून
कसाकाय लागला शनि
होतच राहतात असे
भलते सलते आरोप
साश्रू नयनानी आज तीला
आपणही देऊया निरोप
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:-8424043233
टिप्पण्या