खाकी रंग
*स्वप्न*
जे स्वप्न पाहिलं होतं
ती चढेल आता अंगावर
जिवापेक्षाही जास्त प्रेम
केलं खाकी रंगावर
रात्रीचा दिवस अन
दिवसाची केली रात्र
तेव्हा कुठे ठरलो मी
पोलीस पदास पात्र
या खाकी रंगासाठी
रक्ताचं केलंय पाणी
तेव्हा कुठे आले हे
दिवस सोन्यावानी
जिद्द मेहनत आज
अशी आली फळाला
जो हवा होता तोच
खाकी रंग मिळाला
आई वडिलांच्या डोळ्याचं
पारणे आता फिटेल
पाहून अंगावर वर्दी
त्यांनाही अभिमान वाटेल
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:-8424043233
टिप्पण्या