पोलिसांची दिवाळी*
*पोलिसांची दिवाळी*
ऐन दिवाळीच्या मोक्यावर
निवडणुकीच बिगुल वाजलं
स्वप्न सारं मनातलं त्याच्या
असं अश्रूमध्ये भिजलं
कुटुंबांसोबत चार घास
त्याने खाल्ले असते गोड धोड
पण कर्तव्यापुढे कसली आली
म्हणा दिवाळीची ओढ
सुगंधी उटण्याने त्यानेही
केले असते शाही स्नान
अरे या वर्दीमुळेच तर त्याला
समाजात मिळतो मान
पंचारतीने तिने त्याला
ओवाळले असते आवडीने
पण सण उत्सव पोलिसांना
मिळतात कुठे सवडीने
कुंकवाचा लाल टिळा तिने
लावला असता त्याच्या माथी
त्याग समर्पन बलिदान
हीच खरी पोलिसांची ख्याती
आनंदाने घर सारं
त्याचं गेलं असतं न्हाऊन
दुसऱ्यांच्या आनंदात आनंद
त्यांच्या जगण्यात घेतो जगून
त्यांच्यामुळेच दिवाळी आपली
जर का होतं असेल गोड धोड
खरच पोलिसांच्या त्यागाला
या जगात नाही तोड
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233
टिप्पण्या