दोन घडीचा खेळ

 *दोन घडीचा खेळ.....*


जस जसा पतंग वर जाईल 

तसा तसा तो सुखावतोय 

पशु पक्षीच नाही तर 

माणुसही दुखावतोय


करूच नका मित्रांनो 

नायलॉन मांज्याचा वापर 

फोडायचे तरी कोणावर सांगा 

निष्पाप जीवाचे खापर


जीवावर बेततोय मित्रांनो 

तुमचा दोन घडीचा खेळ 

अजूनही समजवा स्वतःला 

ही गेली नाही वेळ


वेदनेने विव्हळतात 

रक्ताळलेले गळे 

पाहून त्यांची अवस्था 

आमचे भरून येतात डोळे 


का बनता पापाचे भागीदार 

तुम्ही अशा गोष्टी करून 

मनुष्य जन्म नाही येत हो 

पुन्हा कधीच फिरून 


मुक्या जीवाचा तरी तुम्ही 

फक्त एकदा विचार करा 

दुसऱ्याला आंनद देणे हाच 

जगात आनंद आहे खरा

✍️✍️✍️✍️✍️✍️

पोलीस उपनिरीक्षक 

अजय दत्तात्रय चव्हाण 

खाकी वर्दीतील दर्दी कवी 

मो:- 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत