तीळ...

 *तीळ....*


तसं तर तिळाचे 

महत्व आहे खूप 

दरवेळी बदलते 

त्याचे अस्सल रूप 


एक तीळ म्हणे 

सात जणांनी खाल्ला 

तिळा टिळा दार उघड म्हणतं 

चाळीस चोरांनी केला हल्ला


या तीळाबद्दल जर का मनात 

शंका असेल तिळमात्र 

हाच तीळ हलवतो 

पोलीस तपासाचे सूत्र 


कधी आईचा जीव 

लेकरासाठी तुटतो तीळ तीळ

कधी गालावरच्या तिळासाठी 

तो वाजवितो नाजूक शीळ


तीळा टिळा तुला

कसली रे गडबड 

लहानपणी कानावर अशी 

पडली गिते बडबड


हाच तीळाचा प्रवास 

अगदी संक्रातीपर्यंत आला 

तिळगुळ घ्या अन म्हणे 

आमच्याशी गोड बोला

✍️✍️✍️✍️✍️✍️

पोलीस उपनिरीक्षक 

अजय दत्तात्रय चव्हाण 

खाकी वर्दीतील दर्दी कवी 

मो:- 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत