Kho kho


 *खो - खो....*


आवडता खेळ आहे हा 

शाळकरी मुलांचा 

असाच उत्कर्ष व्हावा 

आपल्या पारंपरिक कलांचा


अस्सल मातीतील खेळ आज 

गेला साता समुद्रा पार 

त्यांच्या मेहनतीला आली 

जणू वज्राची धार


खो- को विश्वचषकात आज 

महिलांनी मारली बाजी

जशी थाटात उतरली गड 

धाडसी हिरकणी माझी


अभिमान वाटतो आज 

खो - खो महिला संघाचा 

ज्यांनी वाढविला अभिमान 

आपल्या तिरंगा रंगाचा


खरंच त्यांची कामगिरी 

अगदी कौतुकास्पद आहे 

मनामनातून भारतीयांच्या आज 

राष्ट्रप्रेमाची गंगा वाहे

✍️✍️✍️✍️✍️

पोलीस उपनिरीक्षक 

अजय दत्त्तात्रय चव्हाण 

खाकी वर्दीतील दर्दी कवी 

मो:-8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत