पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अश्रुंचे रेखीव पाट..

इमेज
  अश्रूंचं रोपटं म्हणे तिच्या अश्रूंचं  एक रोपटं उगवलंय गाणं गात कसबस  त्याला तुम्ही जगवलंय हा हा तेच गाणं जे तिने माझ्यासाठी गायलं होतं हा हा तेच प्रित फुल जे तुम्ही उमलताना पाहिलं होतं खूप छान वाटलं तुम्ही आलात  तिचा निरोप घेऊन जे तुम्ही जगवलंय ते अश्रूंचं रोप घेवून तुम्ही बोललात  पाणावलेल्या डोळ्यांनी ती तुझी पाहत असते वाट तिच्या गालावरच तयार झालेत अश्रुंचे रेखीव पाट तुमच्याच तोंडून ऐकलं मी तिला तिचेच आजकाल राहत नाही भान जणू तिच्या देहातले  कुठेतरी हरवलेत प्राण तुम्हीच सांगितलंत ना सारं आयुष्य तिनं केलंय फक्त तुझ्यासाठी बहाल तिला पक्की खात्री आहे तुम्ही एक दिवस नक्की याल पाखरांनो फुलांनो माझाही तिला सांगा निरोप अगदीच अशी तू होऊ नकोस उदास लवकरचं लाभेल तिला  माझा गोड असा सहवास ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो: 842 4043233

उंच भरारी

 *उंच भरारी* नऊ महिन्यांची ट्रेनिग आता झाली अकरा महिन्यांची दुष्मनावर ही वेळ येऊ नये असे दिवस पाहण्याची आधीच होता दुष्काळ अन त्यात आला तेरावा नशिबाचा फेरा असा आमच्यावरच का फिरावा डोळ्यात प्राण आणून चिली पिली वाट पाहतात तिकडे घालावे तरी कोणास  आमच्या वेदनांचे साकडे कुठंवर पुरवायचा या हिरमुसल्या मनाचा हट्ट मन तर अजून थोडं करावेच लागेल घट्ट शेवटी पोलीस आहोत आपण हे चालेल कसे विसरून उंच भरारी घ्यायचीच आहे जिद्दीचे पंख पसरून ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी
 *बरेच दिवस झालं नवीन काही लिहले नव्हतं*  आहे त्यातूनच इकडून तिकडून शोधून पाठवत होतो आज मात्र सहज बसल्या बसल्या  सुचली ही कविता नक्कीच आवडेल आपणास...👍 *सहजच सुचलं* वाचाव्यात माझ्या कविता असं ही काही नाही प्रत्येकच चारोळी आवडेल तसं ही काही नाही चारोळी वाचून माझी फक्त आनंद मिळावा मनाला चुकीचं कधीच मी  पाठवत नाही कोणाला माझ्यात काय कला आहे हे तुम्हास ही कळेल साथ तुमची असेल तर मलाही स्फूर्ती मिळेल पाठवत असतो आवडीने अगदी रोज न चुकता नसेल काहीच पटत तर ब्लॉक ही करू शकता खरंतर ब्लॉक हा पर्याय  असूच शकत नाही दर्दी कवीच्या पंगतीला  कोणी बसूच शकत नाही ✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

गझल

इमेज
*कळपात राहून कळपासारखं..* कळपात राहून कळपासारखं वागणं कधी जमलं नाही त्यांनी काढलं वेड्यात हरहमेशा अंतरीचं दुःख अजून शमलं नाही कुठंवर द्यायचा दोष स्वतःलाच खोट्यापुढे शीर कधी नमलं नाही अपमानाचे पचवून डोस हृदय मात्र अजून दमलं नाही एकटेपणा वाटला आपलासा त्यांच्यात मन कधी रमलं नाही शब्दांनीच केलं हे आयुष्य सुरेख त्यांच्याविना चित्त कुठं गमलं नाही ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

माझे पप्पा...

इमेज
  *माझे पप्पा* तुमची आठवण पप्पा इथे प्रत्येक क्षणी आहे जरी वर्दी माझ्या अंगावर तुमची उणीव मनी आहे दोन्ही बहिणीवर आमच्या तुमचा खूप होता जीव ओलांडली कशी अचानक मृत्यूने त्याची शिव दुःखात बुडून गेली अचानक ही दुनिया खेळती हसती कोरोनाची इतकी का बाबा घेतली तुम्ही धास्ती परिपूर्ण परिवार आता कसा अपूर्ण अपूर्ण वाटतो तुमच्या आठवणीने पप्पा चटकन डोळ्यात अश्रू दाटतो उदास उदास असते तुमची लाडकी परी पप्पा या ना पुन्हा परत  फिरून आपल्या घरी ✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी