आई वरील कविता
मयुरी लहाने यांचे विनंतीवरून लिहलेही ही आई नावाची सुरेख कविता...☺️ *आई* तू जशी आहेस तशीच रहा आई तूझ्याशिवाय जिवलग मला कुणी नाही तू आजारी असली की जीवास लागतो घोर आई भेटली तुझ्यासारखी माझे भाग्य किती थोर तूझ्याशिवाय होतच नाही माझ्या दिवसाची सुरवात आयुष्य असेच सरावे आई फक्त तुझ्या डोळ्यात पहात तुझ्या कुशीत शिरावे बनून लेकरू लहान खरंच ग आई तू इतकी आहेस महान जन्म घेतलाच तर आई पुन्हा घेईन तुझ्याच पोटी तुझ्या चरणाशी माते माझे प्रणाम कोटी कोटी ✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी