जागतिक चहा दिन..

*जागतिक चहा दिन* ओठांना स्पर्श करून ती अलगद सुखावते मनास बहाणा कोणता ही असो ती आवडत नाही कोणास कोणाला कमी गोड तर कोणाला हवी असते कडक झोपेतून उठून ही माणूस टपरीवर जातो तडक कानाला धरून त्याच्या ओठाला लावतात बशी बिचाऱ्या कपाची अवस्था कवितेत मांडू तरी कशी गरमागरम चपाती असो किं असो बिस्कीट बटर खारी चहात बुडवून खण्याची ती मज्जाच होती न्यारी तो पुल्लिंगी किं स्त्रीलिंगी अजून सुटलं नाही कोडं कितीही नाही नाही म्हटलं तरी मन घुटमळतचं ना थोडं किंमत तशी शुल्लकच पण लाख मोलाचे मित्र जोडतो बीनसाखरेचा असो कि कोरा माणूस सवय थोडीच मोडतो ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ PSI अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:-8424043233