पोस्ट्स

कवी कलश

इमेज
 *कवी कलश.....* जगतानाच नाही तर तो  मरताना ही साथ देतो  विझणाऱ्या दिव्याची  काव्यरूपी वात होतो  कितीही भयाण असुद्या हो  त्या मुरदाड मरणाचं रूप  कवीच्या शब्दात म्हणे  ताकद असते खूप  कृष्ण सुदामाचीच फक्त  आम्ही आलो उदाहरणे ऐकत  कवी कलश राजांच्या मैत्रीपुढे  तो मृत्यू ही नव्हता झुकत  निष्ठा काय असते हे  शब्दात सांगणे अवघड  मित्रासोबत जिंकला त्यांनी  क्रूर मृत्यूचा ही गड  मरणयातना सहन करत दोघे  होते मरणाशी झुंजत  तरीदेखील कविता त्याची होती गनिमांच्या कानात गुंजत रक्तरंजित देह जरी जिव्हा गात होती राजांच गुणगान  असा कवी कलश आमचा  स्वराज्यात होऊन गेला महान ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण  खाकी वर्दीतील दर्दी कवी  Mo:- 8424043233
 *धुंदी......* छोट्या छोट्या गोष्टींना  खूपच घेतलं मनावर विरोध केला कोणी  आणि रागावलो कोणावर वड्याचं तेल वांग्यावर  ही चुकीचीच आहे रीत आपणच ठरवायचं आता  आपलं कशात आहे हीत  मी खचलो की त्यांच्या मनाच्या  मोठेपणाचं दर्शन मला घडायचं  चार लोकांसाठी विनाकारण  चारशेंना का सोडायचं   कला म्हणजे असतो जणू  अस्सल सातारी पेढा कंदी सोनं करणारच एक दिवस  फक्त मिळूद्या मला संधी जोपर्यंत चालू राहील माझ्या हृदयातील श्वास तोपर्यंत धरणार मी  माझ्या सुंदर कलेचा ध्यास ✍✍✍✍✍ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

उनाडपणा

इमेज
  *उनाडपणा.......* अशा घटना ऐकल्या की  काळजात होऊन जातं चरर  का कळत नाही पोरांना  आपल्यालाही आहे घर दुश्मनावर ही येऊ नये  अशी वेळ त्यांच्यावर आली  घरच्यांचा मात्र काळजीने  होतो जीव वर खाली सावकाश जा बाळा  नेहमी सांगत असते आई  का माहित तरीही बाळाला   इतकी कशाची असते घाई  कितीही सांगितलं पोटतिडकीने तरी  ते धरतात वेगाची आस  त्यांच्या काळजीने आई बापाचा आतल्या आत गुदमरतो श्वास उनाडपणा असा  त्यांच्या आला अंगलट जिवंत उदाहरणे डोळसमोर तरी  त्यांना का नाही कळत  एका क्षणात होऊन जातं  होत्याच नव्हतं  असं थोडीच कुणाला  कोणाचं नशीब घावतं  हसतं खेळतं घर  दुःखात जातं बुडून  जीवापाड जपलेलं लेकरू   जेव्हा जग जातं सोडून बहिणीचा तो आक्रोश  अन आई फोडते हम्बरडा  त्याच्या पाऊल खुणांना मुकतो  कायमचाच उंबरठा कितीही केला आटापिटा तरी  तो थोडीच येणार आहे परत  दुःख असतं डोंगराएवढं अन  हे आयुष्य ही नाही सरत ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण...

Kho kho

इमेज
 *खो - खो....* आवडता खेळ आहे हा  शाळकरी मुलांचा  असाच उत्कर्ष व्हावा  आपल्या पारंपरिक कलांचा अस्सल मातीतील खेळ आज  गेला साता समुद्रा पार  त्यांच्या मेहनतीला आली  जणू वज्राची धार खो- को विश्वचषकात आज  महिलांनी मारली बाजी जशी थाटात उतरली गड  धाडसी हिरकणी माझी अभिमान वाटतो आज  खो - खो महिला संघाचा  ज्यांनी वाढविला अभिमान  आपल्या तिरंगा रंगाचा खरंच त्यांची कामगिरी  अगदी कौतुकास्पद आहे  मनामनातून भारतीयांच्या आज  राष्ट्रप्रेमाची गंगा वाहे ✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्त्तात्रय चव्हाण  खाकी वर्दीतील दर्दी कवी  मो:-8424043233

तीळ...

 *तीळ....* तसं तर तिळाचे  महत्व आहे खूप  दरवेळी बदलते  त्याचे अस्सल रूप  एक तीळ म्हणे  सात जणांनी खाल्ला  तिळा टिळा दार उघड म्हणतं  चाळीस चोरांनी केला हल्ला या तीळाबद्दल जर का मनात  शंका असेल तिळमात्र  हाच तीळ हलवतो  पोलीस तपासाचे सूत्र  कधी आईचा जीव  लेकरासाठी तुटतो तीळ तीळ कधी गालावरच्या तिळासाठी  तो वाजवितो नाजूक शीळ तीळा टिळा तुला कसली रे गडबड  लहानपणी कानावर अशी  पडली गिते बडबड हाच तीळाचा प्रवास  अगदी संक्रातीपर्यंत आला  तिळगुळ घ्या अन म्हणे  आमच्याशी गोड बोला ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण  खाकी वर्दीतील दर्दी कवी  मो:- 8424043233

दोन घडीचा खेळ

 *दोन घडीचा खेळ.....* जस जसा पतंग वर जाईल  तसा तसा तो सुखावतोय  पशु पक्षीच नाही तर  माणुसही दुखावतोय करूच नका मित्रांनो  नायलॉन मांज्याचा वापर  फोडायचे तरी कोणावर सांगा  निष्पाप जीवाचे खापर जीवावर बेततोय मित्रांनो  तुमचा दोन घडीचा खेळ  अजूनही समजवा स्वतःला  ही गेली नाही वेळ वेदनेने विव्हळतात  रक्ताळलेले गळे  पाहून त्यांची अवस्था  आमचे भरून येतात डोळे  का बनता पापाचे भागीदार  तुम्ही अशा गोष्टी करून  मनुष्य जन्म नाही येत हो  पुन्हा कधीच फिरून  मुक्या जीवाचा तरी तुम्ही  फक्त एकदा विचार करा  दुसऱ्याला आंनद देणे हाच  जगात आनंद आहे खरा ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण  खाकी वर्दीतील दर्दी कवी  मो:- 8424043233

आठवणींचा कप्पा

इमेज
  जवळ जवळ दीड  ते दोन महिन्यांनी आज नवीन कविता सुचली  नक्कीच आवडेल मित्रांनो  आपणास ही कविता.... 👍 *आठवणींचा कप्पा....* प्रत्येकाच्याच मनात असतो  एक आठवणींचा कप्पा  स्वतःच स्वतःशी तो  एकांतात मारत राहतो गप्पा  काही सुखद तर काही  आठवणी असतात तिखट आयुष्याचा आनंद असा कोण  देत असता का हो फुकट आठवणीच जग हे  खूपच आहे विशाल  जीवनाचा आनंद घेत  त्यात हरवून जातो खुशाल काही सुंदर आठवणींने  हळूच हसू उमटते गालात  दुःख ही देतात त्या  खूपच गेलं कि खोलात  जेव्हा कोणीच नसतं सोबतीला  तेव्हा त्याच्यावरव माणूस जगतो  शिकलेला संज्ञान असूनही तो  लहान लेकरासारखा वागतो  भान सारं हरपून तो  गत आठवणीत रमतो  आयुष्याचा सगळा हिशोब  शेवटी इथेच तर जमतो आयुष्य जगण्यास बळ आणायचं कुठून उधार उतारवयात खरंतर  त्यांचाच तर असतो आधार ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण  खाकी वर्दीतील दर्दी कवी  मो:- 8424043233