पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
*भावपूर्ण श्रद्धांजली* काळाच्या खोल दरीत मृतांचा पडला खच  अश्रू झिरपतात काळजातून अन काळीज वेदनेने टच शोक सागरात बुडाले असेल  कृषी विद्यापीठ दापोली कशी मोजावी सांगा ना टपकणाऱ्या अश्रूंची खोली एका क्षणात असं कसं होत्याच नव्हतं होतं जिव्हारी लागणारी जखम अशी कोण देऊन जातं तेत्तीस आकडा ऐकूनच  डोळ्यासमोर येते भोवळ श्रद्धांजली वाहण्याइतपत ही  आता बळ उरले नाही जवळ निष्पाप बळी गेली की  चर्रर्र होतं काळजात माझ्या वेदनेलाही कंप फुटतो  घायाळ करतात आठवणी ताज्या मृत्यूचा सापळा ठरला  तो जीवघेणा आंबनेळी घाट आज दुःखाने भरलाय पहा प्रत्येक हृदयाचा काठ 💐💐💐💐💐💐💐 ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो 8424043233

पोलिसांना ही माणूस म्हणून जगुदया....

इमेज
*पोलिसांना ही माणूस म्हणून जगुदया* दगड गोट्यांचा मानकरी तो सांगा त्याचा काय दोष असतो कायदा सुव्यवस्थाच राखतो तो तरीही जनतेचा रोष असतो  गुन्हा काहीही नसताना  त्याचा हकनाक जातो बळी जनता मात्र तोंडसुख घेते अश्या दुःखाच्या ही वेळी दंगे झाले की तो धावतो  जाळपोळ झाली की तो धावतो असल्या ताण तणावात मित्रांनो अक्षरशः तो कावतो  वयक्तिक वैर त्याचं  कधीच नसतं कुणाशी  तरीही येणारा दगड जखम करतोच जराशी तो भरडला जातो नेहमी शासन आणि जनतेच्या जात्यात सगळेच कसे असतील ओ सांगा बेईमान या पोलीस खात्यात मोर्चाच्या वेळी मी ऐकलेत ते  त्यांचे हृदयास चिरणारे शब्द  शिव्या शाप ऐकून ही जनतेचे त्यास रहावे लागते स्तब्ध तो एक पोलीस आहे  एवढाच काय तो त्याचा गुन्हा नका करू हल्ले त्यांच्यावर जगुदया माणूस म्हणून पुन्हा जगुदया माणूस म्हणून पुन्हा अजय द. चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

पच्चीस जुलाई

इमेज
*पच्चीस जुलाई* शायद उस दिन भी  यारो बुधवार ही था  पूर्णिमा की रात पे वो चाँद सवार था  जब माँ ने मेरी  पकड़ी थी कलाई याद आता है मुझे वो पच्चीस जुलाई  पैतीस वे साल में  अब हो रहा है पदार्पण फिरसे दिखे वो मासूम चेहरा वो दिखा दे कोई दर्पण वो चांदनी रात और चाँद का बलून चाहिए  सो जाऊ माँ के आंचल में वो लोरी की धुन चाहिए  जन्म और मृत्यु के बीच की ये लड़ाई  दिलोंमें जरूर रहेंगे आपके मेरे कलम के अक्षर ढाई  आज जन्मदिन मेरा है तो ए आसमान भी जरूर  बरसेगा फिर इसी दिन बुधवार आने को वो काल भी जरूर तरसेगा ✍✍✍✍✍ अजय द.चव्हाण उर्फ (राहुल ) खाकी वर्दीवाला दर्दी कवी मो. 8424043233

भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
*भावपूर्ण श्रद्धांजली* काळीज हळहळतं अन अश्रू होतात अनावर  किती घाव घालताल  या पोलीस मनावर  आता येईल पहा गणपती बंदोबस्त रस्त्यावर तुमच्यासाठी तो घालत असेल गस्त इच्छा आकांक्षाचा आवळुन गळा  तो तुमच्यासाठीच झटतोय  संकटकाळात मात्र  मामा बनून भेटतोय तुम्हीच मनात चितरलाय ना हा सुरेख पोलीस काका आधीच होरपोळतोय तो आणखी डीवचू नका हृदय पिळवटून टाकणारे त्यांचे सपासप वार तिला सुद्धा हवा होता ना पोलीस पतीचा खंबीर आधार कुठवर गावे तिनं आता हे बेसूर जीवनगाण भकास कपाळावरती पुन्हा नाही ना समाधान हल्ले  खूप झाले  आता तारणारा पाहिजे या पोलीस नावासाठी  अश्रू ढाळणारा पाहिजे या पोलीस नावासाठी  अश्रू ढाळणारा पाहिजे... ✍✍✍✍✍✍ शब्दरचना अजय द. चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

बायकोस काळजी रं माझ्या बायकोस काळजी रं...

इमेज
बायकोस काळजी रे माझ्या बायकोस काळजी रे.. सकाळी उठून चपाती लाटून पोरांना खायाला देई आवरून पोरांचं  धुणं जोरचं  पटपट धुऊन घेई देईल उभारी म्हणून कारभारी  साथ तू सोडू नको तिच्या हाती ना अराम कुठं गोड चहातली ती वेलची रे.... बायकोस काळजी रे माझ्या बायकोस काळजी रे... सोबती रे ती तुझ्याच अन तुला तिचीच साथ शोधूनी मिळेल का अशी बायको घेऊदे जरा मिठीत धरतोस  का वेठीस राग सोडुनी खुश होई रे पुन्हा बायकोस काळजी रे माझ्या बायकोस काळजी रे... आपल्या संसारी जिद्दीनं लढते रोजचा तिचा तमाशा प्रेम गाठीला संसार पाठीला अशी रं भेटली मला रोजचं कुढणं नशिबाला अराम न तिच्या जीवाला बघून हसेल  मनात बसेल प्रेम नाकारू नको होईल संसार सुखाचा असा रं तिच्याव चिडू नको उगाच मारून द्वेष पेरून उगाच बोलू नको श्वास आहे ती या मनाचा गोड चहातली ती वेलची रं.. बायकोस काळजी रं माझ्या बायकोस काळजी रं... शब्दरचना  ✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) *खाकी वर्दीतील दर्दी कवी* मोबाइल नंबर ८४२४०४३२३...

संघर्ष

इमेज
संघर्ष संघर्षाची पताका घेऊन दारोदारी फिरावं आपलं हित कशात आपलं आपणच हेरावं चौफेर उधळू द्यावेत प्रयत्नाचे वारू ध्येय प्राप्ती झाल्याविन नका मागे  फिरू अपयशाची चव कदाचित चाखावीच लागेल कष्टाची लाज ध्येयाला मग राखावीच लागेल हताश निराश होऊन थांबवू नका प्रयत्न प्रयत्नांच्या शिंपल्यातच गवसेल  यशाचे सुरेख रत्न जे निंदा करतायत आज तेच करतील जयजयकार मात करून संकटावर जीवना द्या नवा आकार अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) *खाकी वर्दीतील दर्दी कवी*

हात उसणे...

इमेज
*हात उसणे* वाचता वाचता कविता माझी आवरा जरा हसणे तुम्ही सुद्धा कुणालातरी पैसे दिले असतीलच ना उसणे आपलेच पैसे असून पण भिकाऱ्यासारखे मागावे लागतात गरजेला मदत करून पण लोक असे का वागतात पैसे घेताना मात्र  चेहरे त्यांचे केविलवाणे नंतर मात्र सुरू होते  मग नेहमीचेच रडगाणे अडचणी कुणाला नसतात हो पण देणारा मूर्ख असतो जीवापाड जपलेल्या नात्याचा तो दळवळणारा अर्क असतो म्हणूनच तर मित्रांनो ही  जगभर आहे ख्याती पैश्यानेच तर खरी तुटली जातात नाती माझी कविता वाचून मग भल्या भल्यांना येईल राग असुद्या त्या निमित्ताने तरी त्यांना येईल जराशी जाग कवितेत नावे टाकावीत त्यांची हा विचार होता मणी  नातं तर टिकवायचंच आहे मात्र दुखावू नये कुणी..... अजय द.चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233

मित्रहो...

इमेज
मित्रहो.......... तुमचा हात पाठीवर नसता तर मी कधीच फुललो नसतो मनातलं दुःख कधीच शब्दातून बोललो नसतो तुमची साथ मिळाली नसती तर.. मी कधीच स्फुरलो नसतो या जगाच्या पोकळीत  नावालाही उरलो नसतो तुम्ही वाहवा केली नसती तर.. मी कधीच उजळलो नसतो जीवनाच्या अंधारात वेदनांनी पोळलो असतो लिहताना दरवेळी  तुमची याद सोबत नसती तर... शब्दांना कधीच  पंख फुटले नसते निसर्गातील मित्र सारे कवितांमधून भेटले नसते कदाचित... तुमचा अंश माझ्यात नसता तर शब्दही सारे मृत भासले असते दुःख आमच्या अंगणी दात विचकत बसले असते तुम्ही मार्ग दाखविला नसता तर.. आम्ही नेहमीचाच रस्ता चुकलो असतो चण्या फुटण्याच्या भावाने मग बाजारात विकलो असतो तुम्ही आवाज दिला नसता तर... कदाचित आम्ही जागलो नसतो मनपिसारा फुलवून मग आनंदाने जगलो नसतो  अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

बदली

इमेज
बदली होतेय सर तुमची पण काळीज आमचं तुटतंय पुन्हा भरारी घेण्यास सज्ज हेही आम्हास पटतंय संयम म्हणजे काय हे तुमच्याकडूनच शिकलो मोठ्या मनानं माफ करा जर आम्ही असेल चुकलो भावनांचा मेळ न बसणे ही एक प्रकारची व्याधीच आपण घडविलेला प्रज्ञावंत पोलीस डगमागणार  नाही कधीच तुम्ही नेहमीच गाठावीत सर यशाची उंच उंच शिखरे मात्र विसरू नयेत ही आपल्याच कुटुंबातील लेकरे इथून पुढचा प्रवास सर सुखाचा होवो आपला आपल्या आदर्श कार्याचा ठसा आंम्ही हृदयात खोलवर जपला शिस्त आणि प्रामाणिकपणाचं आपण उदाहरण एक जिवंत आपण घडविलेला प्रज्ञावंत पोलीस एक दिवस नक्कीच होईल संत