पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Promotion

इमेज
*Promotion* प्रत्येकालाच असते मनी आपल्या पदोन्नतीची ओढ खुशीत मग पदोन्नतीच्या मित्रांचे तोंड करतो गोड पदोन्नती म्हणजे नोकरीतील एक मैलाचा दगड जस काय आपण एखादा जिंकून आलोय गड गरम कपातला चहा जसा हळूच ओतावा बशीत आनंदाला नसतो पारावार अन आपण असतो खुशीत गाळलेल्या घामाचं मग  हे चीज होतं असं सुरवंट्याचं सुरेख हे फुलपाखरू होतं जसं जशी मिळते पदोन्नती तशी जबाबदारी ही वाढते  सक्षम बनविण्या स्वतःला आपले मन मनाशी लढते वरिष्ठांकडून होतो सत्कार अन सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव आनंदाच्या सरीत भिजून जातो हा पोलीस नावाचा गाव आनंदाच्या सरीत भिजून जातो हा पोलीस नावाचा गाव ✍✍✍✍✍✍ शब्दरचना अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

तू येशील ना नक्की....

इमेज
तू येशील ना नक्की.... तू येशील ना नक्की.... डोळे लागलेल्या वाटेवरून विरहात उसळलेल्या  भावनांच्या लाटेवरून तू येशील ना नक्की.... तुझी वाट पाहताना या भिजल्या अश्रूंसोबत  तुझ्या स्मृती वाहताना तू येशील ना नक्की.... त्या भारल्या क्षणांत सुगंध श्वासातील देण्या या काटेरी वनात तू येशील ना नक्की.... मी सांगेल तेव्हा प्रीतीचा वसंत हा असा फुलतो जेव्हा तू येशील ना नक्की.... स्वप्ने मुठीत घेऊन सुखावशील आसुसलेल्या जीवास असाच मिठीत घेऊन ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल  खाकी वर्दीतील दर्दी कवी

जन्मदिन मुबारक हो भाई...

इमेज
मेरा चचेरा भाई दयानंद चव्हाण को मेरे इस कवितासे जन्मदिन ही  हार्दिक शुभकामनाएं.... *जन्मदिन मुबारक हो भाई* तुम्हारे नाम मे ही है आनदं और दया भी हम तुम्हारे भाई और तू हमारा साया भी हमारे खुशी का ठिकाना कहा जो जन्मदिन है तेरा आज पहना दे ये कुदरत भी तुझको खुशियोंका ताज चाहकर भी तुझसे ये कभी रूठे ना जमाना प्यार से प्यार परोसकर इंसानियत तू कमाना तुझसे दिल्लगी है प्यारे और मिठिसी चाहत भी तुझे मिल के दिल को मिलती  हलकीसी राहत भी सलामत रहे तेरा ये नन्ही चिड़ियोंसा जहाँ इन कीमती शब्दोंसे महंगा तोहपा  बोलो इस दुनियामें कहाँ हमारी भी लगे उमर तुझे तू जिये सौ साल पूरे इस जन्मदिन पर भाई   यही है अरमान मेरे ✍✍✍✍✍✍ शब्दरचना  अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

चिमणा संसार

इमेज
चिमणा संसार चिमणा चिमणीचा चिमणा संसार गोजिरवाणी त्यांची पिले होती चार चारही पिले त्यांना जिवाहूनही प्यारी त्यांच्याच भविष्याची चिंता त्यांच्या उरी  सुंदर घरटं बनवलं त्यांनी काडी काडी जमवून पिलांना मोठं केलं  चोचीत घास भरवून पिले जसजशी  होत गेली मोठी जणू जन्मलीच ती होती दुसऱ्यासाठी जसजसं पंखात  बळ येत गेलं एक एक पिल्लू घरटं सोडत गेलं पिलांचे संसार फुलले त्यांनाही पिले झाली डबडबणाऱ्या डोळ्यात अश्रूंची फुले झाली संसार पिलांचे फुलवून आईची झाली आजी आता आयुष्यभर वाहतील ते एकलेपणाचीच ओझी आता विरहात जळणारी घरट्यामध्ये दोघचं हर एक आठवनीगणिक अश्रुंचे ओघचं ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी

दुनियेची रीत

इमेज
*दुनियेची रीत* जिंकून सुद्धा कधी कधी नियतीपुढं हरावं लागत गुन्हा नसताना ही कधी कधी आपल्याला दोषी ठराव लागतं मागूनही मिळत नाही अन  हिसकावून ही घेता येत नाही पेरावा जीवनात आनंद जरासा असे सुपीक कुठे शेत नाही आपलंच खरं म्हणणाऱ्यांच्या दुनियेत सत्य मात्र टिकत नाही आपल्याला सल्ले देणाऱ्यांचे मात्र कधीच चुकत नाही समजावून सांगता सांगता आपल्या डोक्याचं होत भरीत चांगल्या गोष्टींची टर उडविणे हीच तरी खरी दुनियेची रीत जाराश्या गोष्टीने आजकाल ही दुखावली जातात मनं समजून घेणारं कोण नसत म्हणून आतून घुसमटत हे जिणं ओरडून ओरडून सांगूनही समोरच्याला समजत नाही म्हणूनच आजकाल सहसा कुणाशी माझं जमतं नाही ✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

सावंतवाडी

इमेज
*सावंतवाडी* डोंगराच्या कुशीत  हिरवीगार झाडी किती मोहक दिसते ही सावंतवाडी नगरपालिकेच्या घड्याळात केवढाले काटे स्वप्नाहून सुंदर  राजवाडा वाटे तलावाच्या किनाऱ्याने दिव्यांची रांग मन भुलतेच ना तिथे अक्षरशः सांग सायंकाळी जणू  सोनकळी भासते प्रत्येकाला ओढ  तिथलीच असते रस्त्यामध्ये लागतो सुंदर आंबोली घाट पाहताना निसर्गसौंदर्य भिजतो डोळ्याचा काठ मन लुभावतात आकर्षक कोरीव लाकडी खेळणी जणू निसर्गाने दिलेली कलेची वरओवाळणी तिथल्या भाषेत आहे फणसाची गोडी तळलेल्या माश्यासोबत खावी कोकमची कडी ✍✍✍✍✍✍ शब्दरचना अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

धुंदी

इमेज
*धुंदी* बस झालं आता खूप केलं अति काही मोहाच्या क्षणांसाठी विसरलो मायेची नाती पोखरत गेलो डोंगर  हाती काही आलं नाही चेहऱ्यावर हावभाव असा जस काही झालचं नाही अशी कोणती होती धुंदी पावले आपोआपच वळायची माहीत असूनही सारं शेपटी आपली आपणच जाळायची कित्येकदा घेतली मी शपथ पाणी त्यावर सोडले तुझ्या मनाच्या मोठेपणाचे दर्शन मला वेळोवेळी घडले खरचं डोळ्यावरची आता उतरली सारी धुंदी शेवटचच माफ कर मला अखेरची दे एक संधी जोपर्यंत माझा आता चालू असेल श्वास तोपर्यंत त्याचा मी आता ना धरणार पुन्हा ध्यास ✍✍✍✍✍ शब्दरचना  अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

व्यथा बावऱ्या मनाची

इमेज
*व्यथा बावऱ्या मनाची* ही प्रीत नाही खोटी हा प्राण आला कंठी सैल रे मिलनाची मिठी ना अन्य काही ओठी तुझी प्रीत ती खरी माझ्या जपते रे उरी आता जिंदगी ती कोरी येशील कधी रे घरी तुला मनी रे स्मरती तू पुन्हा यावा परती माझा जीव तुझ्या वरती नाही लादणार शर्ती ना देणार त्रास पुन्हा घडला काय रे माझा गुन्हा दे अन्य कोणतीही सजा तुझ्यावीण ना जीवनी मजा माझ्या प्रीत पाखरा का तू उडुनी गेला मला सोडुनी गेला प्रेम पाश सारे तू असा तोडूनी गेला ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233