पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बंड

 बंड जराशी लिखाणात मी पडलो थोडासा थंड शब्दांनी पुकारलं  माझ्याविरुद्ध बंड म्हणे तू आम्हाला आता कवितेत का नाही मांडत बसले नां राव ते चक्क  माझ्याशीच भांडत तूच लावली सवय आम्हाला एका पंक्तीत बसायची माझी बाराखडीची लेकरे कवितांच्या कुशीत हसायची आम्हाला अनोखं रूप दिलं   ते होते साहित्यिक संत साधु तुझ्याही लेखणीत आहे अशीच काहीशी जादू तू गुंफत जा शब्दांना कवितांच्या सुरेख माळेत असले अनुभव मिळतात  फक्त आयुष्याच्या शाळेत तुझ्या लेखणीच्या स्पर्शाने आम्हा मिळते सोनेरी किनार  एक दिवस नक्कीच मित्रा  तू खूप मोठा कवी होणार ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ PSI अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:8424043233

आत्महत्येचं येड...

इमेज
मेरिटमध्ये म्हणे तो एक मार्कांने हुकला ठीक आहे हरला असशील पण निर्णय तुझा चुकला एका अपयशाने मित्रा  असा जीवावर का उठतो हा आयुष्याचा प्रश्न तरी  कुठं भल्याभल्यांना सुटतो अरे अपयश असतं पोरकं  अन यशाला हजार बाप उगाच डोक्याला एवढा  करून घ्यायचा नाही ताप  जरी नाही मिळालं तुला आयुष्यात जे हवंय अपयश पाचविण्याची मित्रा तू लावून घे सवय अर्ध्यावरती असा तू सोडू नको रे डाव हरविण्या संकटाना तू ताकद मनाची लाव ज्यांनी जन्म दिला तुला  त्यांचे पांग तरी फेड डोक्यातून काढून टाक बाबा  हे आत्महत्येचं येड

C-60 commando...

 *C-60 कमांडो* C-60 कमांडो कोणाच्या बापालाही नाही भीत जगणं आणि मरण यातील फक्त अंतर एक वीत मरणाच्या दारात छातीचा करतो कोट कधी होते कत्तल तर कधी भुसुरुंग स्फ़ोट चित्यासारखे चपळ अन वाघासारखे आहेत शूर पर्वा नसते कधी त्यांना  नदी नाले की असो पूर C-60 कमांडो म्हणजे खरंतर जंगलचा बाप  नुसत्या नावानेच नक्षल्यांचा उडतो थरकाप खाण्यापिण्याची त्यांची होते कितीच तरी अबाळ जमीन त्यांचं अंथरून अन पांघरून असतं आभाळ तुडवीत काट्याकुट्याचा रस्ता तो डोंगर दऱ्यातून धावतो नक्षल्यांच्या योजनांना असा भुसुरुंग लावतो विरभोग्या वसुंधरा मनात जपतो ब्रीद  कधीच नसतो घरी तो दिवाळी असो की ईद कित्येक सहकाऱ्यांनी इथे  लावली जीवाची बाजी म्हणूनच प्राणाहूनही प्रिय आहे मला C-60 कमांडो माझी ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ PSI अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :- 8424043233

प्रिय पत्नीस...

 प्रिय पत्नीस.... पंधरा वर्षाचा सखे हा  किती खडतर प्रवास सारा  आसुसलेल्या जीवास माझ्या  तुझ्या कुशीत मिळेना थारा लग्नाचे वाढदिवस कुठे सांग  असतात पोलिसांच्या नशिबी सहवासाचे क्षण तेवढे सखे ठेव तू आपल्या हिशोबी सण उत्सवात पोलिसांची  अवस्था खूपच असते गंभीर पोलीस पत्नी आहेस तू मन अजून कर खंबीर सवय झालीच असेल तशी तुला या पोलीस नोकरीची माझ्या हीच खरी कसोटी म्हणत करू लग्नाच्या आठवणी ताज्या वाटणं साहजिकच आहे या क्षणी सोबत मी असावे शुभेच्छा स्वीकारत माझ्या नकळत गाली तू हसावे ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण  खाकी वर्दीतील दर्दी कवी

सत्र क्रमांक 32

 *सत्र क्रमांक 32* (2005 ची बॅच)  अठरा वर्षाच्या नोकरीत वाढवली वर्दीची शान  चारचौघात तिला वेगळाच आहे मान वर्दी चढली अंगावर ती तारीख होती सतरा  त्या वर्दीसाठीचा संघर्ष  तुला काय सांगू मित्रा  हुल्लड मनाचा मी असा झालो वर्दीधारी तिच्या स्पर्शाने माझी बदलली दुनिया सारी हा हा म्हणता नोकरीची पूर्ण झाली अठरा वर्ष अजूनही नाही वर्दीस कुठे  गालबोटाचा मलीन स्पर्श निष्कलंक सेवेची आज झाली अठरा वर्ष पूर्ण वर्दीसाठीच जगणं आमचं अन वर्दीसाठीच मरणं

मुंगीताई

इमेज
  मुंगीताई रोज लागते माझ्या दारी चिमुकल्या मुंग्याची रांग अविरत मेहनत तुझी सतत चालते कशी सांग कष्ट तुझे चालू दिवस अन रात्र खरंच मुंगीताई तू कौतुकास आहेस पात्र तुझ्याकडूनच शिकलो बळ काय ते एकीचे तशी तू सुज्ञच आहेस तुला सांगू काय बाकीचे तूच शिकवले आम्हास शिस्तीचे कठोर नियम गोष्टी तूझ्या प्रेरणादायी तशा असतातच कायम इवलूसा जीव तुझा पण  दिसतेस ही तितकीच छान खरंच मुंगीताई तू या जगात आहेस महान ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :- 8424043233

निरोप समारंभ..,..

 *निरोप समारंभ* काय बोलावे मला ते  आत्ता काहीच कळत नाही तुमच्या आठवणींचा सूर्य मनाआड का ढळत नाही थोडा आनंदाचा आणि थोडा क्षण हा दुःखाचा इथून पुढचा प्रवास तुमचा नक्कीच होईल सुखाचा तुम्ही सोडून चाललात याचे दुःख नक्कीच आहे मनी मन गहिवरते आमचे अन डोळे पाणावतात या क्षणी  तुमच्याविना जिवलग आम्हा दुसरे कोणीच नसे मनामनात उमटलेत  तुमच्या अस्तित्वाचे ठसे भारावलेल्या मनाने आम्ही आज निरोप देतो तुम्हास फक्त हृदयात तुमच्या नेहमी जागा असावी आम्हास ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

विहिरीवरचे पाणी....

इमेज
  विहिरीवरचे पाणी आत्ता कुठे आले घरोघरी नळ नाहीतर हंडा घे अन विहरीवर पळ तांब्या पितळीचा हंडा  चकाचक घासायचा इतका सुरेख तो प्रत्येक दिवस असायचा हंड्यावर हंडे असे  डोक्यावर असायचे तीन कमरेभोवती वरून कळशीची सुरेख वीण  दोन्ही हातात भरलेल्या बादल्या असायच्या दोन आत्ताच्या काळात असली कसरत करतं कोण कधी रस्सी तुटायची तर कधी बादली बुडायची भरताना पिण्याच पाणी सगळी तारांबळ उडायची गावच्या गोड आठवणींचा  कसा पडेल विसर  असं हे गावचं जीवन शहरात मात्र झालं धुसर ✍️✍️✍️✍️✍️ PSI अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233