पोस्ट्स

जून, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🇮🇳 वीर जवान तुम्हे सलाम 🇮🇳

इमेज
🇮🇳 वीर जवान तुम्हे सलाम 🇮🇳 नौजवान खून  आता है  भारत माता के काम ऐसे ही नही मिलता किसी को शहीद यह नाम गोली का जवाब  देना पड़ता है गोली से ऐसी ही नही जीती जाती जंग सिर्फ ही बोली से तिरंगे में लिपटे बदन ऐसें शान से जीते है गर्व है हमे ऐसें वीर हिन्द में जन्म लेते है भारत माता पे लुटा गए जान वतन के दीवाने इनकी शहादत के लिए खाली है हमारे दिल की मकाने गर्व ही नहीं हमे आप पर फक्र भी तो है हर माता को मिले ऐसा बेटा ये जिक्र भी तो है कैसे करूँ पूरी कविता अब मै कांप रहे है आज मेरे हाथ इन नौजवान की शहादत पर होती है आसुओं की बरसात ऐसे नौजवान की शहादत पर है आज आँसुओ की बरसात.... अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दी के दर्दी कवी 8424043233 जय हिंद 

पहिला पाऊस

इमेज
पहिला पाऊस सखे पहिला पाऊस जेव्हा मी अंगावर झेलत असतो तुझा विरह काट्यासारखा नयनात सलत असतो तू दिल्येल्या आठवणींचा ओलावा   अजूनही आहे सुगंधित  हरवून जातो असाच मी या कल्पनेच्या धुंदीत सखे तुझ्या सहवासात तेव्हा श्वासही भिजला होता घेताना मिठीत तुला  तो गुलमोहर ही लाजला होता सखे नेहमी असे वाटते पहिल्या पावसात  तू मी सोबत भिजावं  पाहून आपलं प्रेम ते फुलपाखरू लाजावं आज पुरता ओलाचिंब झालो तुझ्या विरहाचे दुःख गिळताना आज पुन्हा एकदा वीज हसली मला एकांतात छळताना अजय द चव्हाण उर्फ राहुल  खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

*रंग आठवणींचा*

इमेज
*रंग आठवणींचा* आठवणीतच रंगलो होतो आज साजरी करताना होळी पिचकारीतूनही सुटत होती जशी बंदुकीची गोळी आठवणींच्या रंगापुढे फिके रंग सारे रंगून देखील रंगात मुके अंग सारे या मूक अंगास आता सहवासाचा हवा रंग हवाहवासा वाटतो मनास प्रत्येक भेटीचा नवा रंग चित्रकार अशी तू रंग भरले जीवनात रंगापलीकडच्या हि शुभेच्छा तुला छायाचित्र कोरले हृदयात अजय द. चव्हाण उर्फ  (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233 💝💝💝💝
इमेज
चंद्र आपला आली असेलच संध्या आता अंधार पाठीवर घेवून तू बसली असशील  चंद्र आपला कुशीत घेऊन नुकत्याच त्याने प्यायल्या  असतील अमृत धारा त्याच्या जगात धुंद  तो  एकटाच अजाणता तारा लोहाराच्या भात्यासारखी  हलवीत मांडी तुझ्या मनाच्या चांदण्या गात असतील अंगाई आली असेलच ओठावर त्याच्या पाहुणी बनून जांभई अजून तर एवढासाच आहे तो म्हणेलच ना उद्या बाबा आई झोपलाच असेल तो  जग सार मुठीत झाकून थकला असेल बिचारा चांदमामाची हरणांची गाडी हाकून तो हसला असेल  नाजूकश्या चिमण्या ओठात पऱ्या भेटल्याच असतील त्याला पंखवाल्या स्वप्नात  त्याच गोंडस देखणं रूप तुझ्या डोळ्यात नीट साठऊन ठेव काही साम्य असेलच आमच्यात फक्त तू नीट आठवून ठेव अजय दत्तात्रय चव्हाण  उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

Happy Birthday Anuj

इमेज
गहिवरतो हा बाप तुझा  तुझ्या वाढदिवसाला मी येऊ शकत नाही रे बाळा तुझी प्रत्येक आठवण जीवाला  लावून जाते लळा आज 15 जून आणि वाढदिवस तुझा सातवा तूच माझा लाडला अन तूच माझा मितवा तुला घेऊन खांद्यावर अनुज खूप नाचावसं वाटतं तुझ्या विरहाच दुःख नयनात तसंच आटतं तुझ्या वाढदिवसाचे क्षण  डोळ्यासमोरच नाचतात नाही मी तिथे या वेदना  बापाच्या हृदयी बोचतात  तुझा प्रत्येक हट्ट मी  जिवापल्याड पुरवावा  तुझा उज्वल भविष्यकाळ असा आनंदाने सारवावा आणखी काय देऊ तुला अनुज  मी शुभेच्छा गहिवरतो हा बाप तुझा  मनातून  सच्चा सातव्या वाढदिवसाच्या तुला खुप खुप शुभेच्छा अजय दत्तात्रय  चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

पावसाचा पहारा

इमेज
पावसाचा पहारा पावसाचा पहारा होता आडोश्याचा सहारा होता तुझ्या माझ्या प्रेमाला भरवशाचा किनारा होता पावसाचा पहारा होता आडोश्याचा सहारा होता तुझ्याजवळ येण्याचा तोच एक बहाणा होता पावसाचा पहारा होता  आडोश्याचा सहारा होता माझ्यासाठी ओठात तुझ्या चिऊताईचा चारा होता पावसाचा पहारा होता आडोश्याचा सहारा होता माझ्या चिंब भिजलेल्या देहाला तुझ्या कुशीतच थारा होता  अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

चारोळी

इमेज
चारोळी 

आयुष्यभराच लेणं

इमेज
आयुष्यभराच लेणं बालपणं त्यांचं जाईल असच भुर्रकन उडून एक दिवस चिमण्या या जातील घरटं सोडून कुणी म्हणत पिलू कुणी म्हणत चिऊ कळवळणार हृदय म्हणत आम्हा  सोडून नका जाऊ बोट धरून चालणं अन तिचे बोबडे बोल सोडून जात पिलू तेव्हा अंतरात जखम असते खोल तिच्या मिचमीच्या डोळ्यात अख्ख जग सामावलेलं असत सुन्न आपलं जग अन सारं गमावलेलं असत मुली म्हणजे असतात म्हणे परक्या घरचं देणं एका क्षणात निसटून जात हे आयुष्यभराच लेणं मुलगी नको म्हणनांऱ्यान्नो होऊद्या जरा पापणी ओली किती गोंडस वाटतात ना या फोटो मधल्या मुली ✍ �✍�✍�✍�✍�✍� अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील  दर्दी कवी 8424043233

वारी पंढरीची

इमेज
*वारी पंढरीची * शब्दांनीच तर शिकवलं मला जीवनाचं संगीत आवडीनं गावं असं एक सुरेल गीत शब्दांशीच जुळलं आहे एक आपुलकीच नातं त्यांच्या भोवती सारखं मन घिरट्या घेतं एकलेपणात खरतर त्यांनीच दिली साथ दिवा तेवत ठेवला आनंदाचा पेटवून स्वतःची देहवात जेव्हा पुसट होत गेल्या तिच्या सहवासाच्या रेषा त्यांनीच शिकवली अश्रूंना कवितेची सुंदर भाषा उदास क्षणांचे त्यांनीच तर केले नभीचे चमचमते तारे दुःखाच्या कारंजीतून आनंदाचे फवारे ही शब्दांची दुनिया मला खूपच न्यारी वाटते आनंदाने सामील व्हावी अशी अशी पंढरीची वारी वाटते आनंदाने सामील व्हावी अशी अशी पंढरीची वारी वाटते अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

वटपौर्णिमा Special

इमेज
             Dedicated to my wife Arati
इमेज
असाच बहुतेक घडतो कवी असाच बहुतेक घडतो कवी ठेच लागूनी वेदनांची असेच बहुतेक चिरते मन काच लागुनी भावनांची दुःखाच्या अंगारावरती  चालूनी पाय पोळतात अश्याच वेळी मनात  असंख्य विचार घोळतात असाच बहुतेक घडतो कवी नवविचारांची झालर लेऊनी ठसा उमटवूनी जातो हृदयात गीत ठेवुनी असाच बहुतेक घडतो कवी देऊनी अग्निपरीक्षा जळताना शब्दचितेवरती भाळी लावावी काव्यरक्षा अग्नीत होरपळून जसे  पोलादाचे होते शस्त्र परस्थितीत होरपळून तसे काव्य कवीचे बनते अस्त्र काव्य कवीचे बनते अस्त्र अजय दत्तात्रय चव्हाण  उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

माझी कविता कधी तुला

इमेज
माझी कविता माझी कवीता कधी तुला......             पाखराचं गाणं देईल             नाजूकश्या गालात हसणाऱ्या             लेकराचं जिणं देईल माझी कविता कधी तुला........                  स्वप्नांचा झुला झुलवील                  कधी प्रेमाने गोंजारत                  फुलाप्रमाणे फुलवील माझी कविता कधी तुला........                   हृदयातील श्वास देईल                   मैत्री म्हणजे टिपूर चांदणं                  असा दृढ विश्वास देईल माझी कविता कधी तुला......                  सर्वस्व अर्पण करील                  तुझ्या हसऱ्या चेहऱ्यास...

प्रीतीची शपथ तुला आता तरी धाव रे..........

इमेज
प्रीतीची शपथ तुला आता तरी धाव रे.......... आठवता सारे काही रडू न आवरे प्रीतीची शपथ तुला आता तरी धाव रे.......... तू नसता उदास सारे अंगावरी येती शहारे मी उदास क्षणही उदास उदास भासतो गाव रे..... प्रीतीची शपथ तुला आता तरी धाव रे.......... स्वप्नात तू येतो  पापण्यात  रहातो श्वासागणिक मला तुझाच भास होतो तू येशील कधी ही आस मना दाव रे........ प्रीतीची शपथ तुला आता तरी धाव रे.......... विरह मला तुझा  काट्यापरी टोचतो घायाळ करुनी तो थेट हृदयी पोचतो थांबेल वेदना परी भरेल का घाव रे........ प्रीतीची शपथ तुला आता तरी धाव रे.......... धावत ये असा अन मार ना मिठी ओठांना अलगत टेकव ना ओठी घे मिठीत अन उलगडुदे मनातील भाव रे..... प्रीतीची शपथ तुला आता तरी धाव रे.......... ये लवकरी आता  घाल करांची बेडी आतुर जीव होई  बावरते ही वेडी वेड लागले तुझे बदनाम झाले नाव रे...... प्रीतीची शपथ तुला आता तरी धाव रे.......... अजय दत्तात्रय चव्हाण  उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी ...

Happy Anniversary

इमेज
🎺🎸वाढदिवस लग्नाचा🏇 लग्न बंधनात अड़कलो आपण त्यास वर्षे झाली आठ दिवसेंदिवस घट्ट होत गेली आपल्या संसारचि रेशिम गाठ🎺 नववधुप्रमाने नटली होती जणू त्या दिवशी ही धरती लक्ष्मी नारायनचा जोड़ा आपला अजय आणि आरती💑 तुझे माझे प्रेम असे वर्षानुवर्षे वाढत राहील तुझ्या पाणीदार डोळ्यात आपल्या दोघांचे रूप पाहिल👁👁 आपल्या संसाररूपी वेलिवर उमलली दोन गोंडस नाजुक फुले🌹🌺 त्या फुलांच्या मनमोहक सुगंधाने आयुष्य सुगन्धित केले✌� तुझ्या सहवासात होउन गेला ख़ास हा आठ वर्षाचा प्रवास🎠 देह जरी दोन असले तरी एकच आहे श्वास💘         एकच आहे श्वास💓💗                          अजय द चव्हाण 📝          ऊर्फ (राहुल) ✍ खाकी वर्दीतील दर्दी कवी✍     8424043233🚩