पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
आकांक्षापूर्ती   फक्त एक दिवस द्या मला  माझ्या आकांक्षापूर्तीसाठी मी चलबीचल झालोय  त्या एका सोनेरी क्षणासाठी माझ्या कवीतांनी बहरलेल्या पुस्तकांच्या पानासाठी उत्कंठा शिगेला पोहचलीय डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी जिथं वाटतंय श्वासच थांबलाय तो निश्वास सोडण्यासाठी आयुष्यात तो क्षण  कधी कधी नाही भेटणार जिवंतपणी स्वर्ग पाहुद्या मला पुन्हा कधीच काही नाही म्हटणार पाणावलेल्या डोळ्यांनी फक्त एकदा ते शब्द पाहुद्या असे येतील कित्येक क्षण तो क्षण तसाच अंतरात राहुद्या अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल  खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

स्वप्न मुलांचे

इमेज
स्वप्न मुलांचे (बालगीत) असे वाटते मुलांना पंख असावे परीसरखे उंच जावे आकाशात  उडुनी घारीसारखे सर सर चढावे झाडावरती पिटुकल्या खारीसारखे असे वाटते मुलांना फुलांनी वाऱ्यास सजवावे पाऊस बनूनी ढगांचा सूर्यास भिजवावे असे वाटते मुलांना चंद्रासंगे खेळावे सारे तारे त्यांना मुठीत मिळावे हसुनी तारे सारे स्वप्न मुलांचे व्हावे खरे  शब्दरचना अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

Happy Birthday Ajay D Chavan

इमेज

My 33rd Birthday

इमेज

आज शोभून दिसतो माझा वाढदिवस खरा

इमेज
                      आज शोभून दिसतो माझा                                 वाढदिवस खरा        अंधाराच्या कुशीतून  अंकुरावा जन्मदिवस मग मी ही ईश्वराला  बोलीन एक नवस           तुझाच आशीर्वाद           पाठीशी असुदे जरा.....        आज शोभून दिसतो माझा         वाढदिवस खरा...... फुलांनी सुगंधित करावं वातावरण अन फुलपाखरांनी रंग द्यावे लाटांनी गुणगुणावं गाणं  अन पाखरांनी पंख द्यावे           असे हे सोनेरी क्षण अन            मुठीत आसमंत सारा.....         आज शोभून दिसतो माझा                वाढदिवस खरा......  नदीन वाहत रहावं वाऱ्यान गात राहावं आज सजलेल्या क्षणांना  नयनात सामावून घ्...
इमेज
आठवणी शाळेच्या  फीरून त्या आठवणीनां मिळतो कसा  उजाळा नजरेस पडते जेव्हा आपल्या गावची शाळा पांढरा half शर्ट आणि चड्डी होती खाकी करगोटा चढवायचा तेवढा असायचा बाकी पांढरी पेन्सिल आणि काळी होती पाटी पाया मजबूत हवा ना जीवन संघर्षासाठी गांधी टोपी डोक्यावर अन शेम्बुड असायचा नाकाला घाबरायचो ना आम्ही शेवाळे गुरुजींच्या धाकाला आज इतके मोठे झालो पण शाळेत जायचा मोह आवरत नाही चिमूकल्यांना डोळ्यात भरताना आपले बालपण मिरवत नाही जशी असते आपली आई तशीच असते ना आपली शाळा कितीही मोठे झालो आपण तरी तिच्याबद्दल असतोच ना जिव्हाळा  ✍✍✍ अजय द चव्हाण उर्फ (राहुल) आठवण प्राथमिक शाळा मानेकॉलनी

ते काव्य

इमेज
आपोआप फुलतं ............................ते काव्य झोपळ्यावर झुलत ...........................ते काव्य हसत हसत खुलतं ...........................ते काव्य झुंबर होऊन हलत................  ..........ते काव्य डोळ्यातल्या डोळ्यात बोलत.............ते काव्य काट्यांवरून चालत ........................ते काव्य पिकल्यावर फलत...................... ....ते काव्य आठवण होऊन सलतं .....................ते काव्य दिवस होऊन ढलत ............    .........ते काव्य दुःखांना झेलत ...............................ते काव्य संकटांना पेलत ..............................ते काव्य सुख होऊन कलत ..........................ते काव्य अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

खाकी वर्दीतील दर्दी कवी

इमेज
                        मरायचं तर प्रत्येकालाच आहे                         थोडंस हटके जगायचं आहे                         खाकी वर्दीतील दर्दी कवी हे नाव                         प्रत्येक हृदयात ठेवायचं आहे.                                                अजय दत्तात्रय चव्हाण                                     उर्फ (राहुल)                               खाकी वर्दीतील दर्दी कवी                         ...

माझ्या गुलाबाच्या फुला

इमेज
माझ्या गुलाबाच्या फुला किती लावशील जिव मला।। किती त्रास सहन करशील माझ्या जपन्या मनाला आठवनिविना लवत नाहीत तुझ्या पापण्या क्षणाला ।। माझ काही दुखल तर वेदना होतात तुला सार लक्ष माझ्याकडे  झोप नसते तुला।। इतकी का आतुर होतेस कधी एकदा मला भेटाव अस शांत झोपुन राहव अन तुम्ही आल्यावरच उठाव्।। इतका का जीव लावते मला जशी आई बाळाला लावते सर्वस्व वाहिलस मला जशी वात ज्योतिला वहाते।।                        अजय द. चव्हाण                   ( उर्फ़ राहुल)         खाकी वर्दीतील दर्दी कवी         8424043233

शिवछत्रपती राजे

इमेज
⛳ शिवछत्रपती राजे ⛳ दिगंतातून डंका वाजे जय शिवछत्रपती राजे आठवून कार्य त्यांचे  रक्त उसळते माझे सह्याद्रीचा सिंह हा शक्ती ही मर्द मराठी  उधळून प्राण फुले वाहीन जीवन त्यांच्याचसाठी हाती भगवा अन मस्तकी असे चंद्रकोर पाषाण ही फोडू असा मनगटी असे जोर स्वराज्याचा मावळा मी शिवचरणी झुकतो माथा काय सांगू गड किल्ले अन मराठी पराक्रमाची गाथा हिंदवी स्वराज्य स्थापिले  सोबत अठरा पगड जाती नसनासातुनी आदर राजांचा  पावन झाली ही दख्खन माती सह्याद्रीच्या कडी कपारीला अभिषेक झाला शिवस्पर्शाने  धन्य झाला मावळा हा शिवगीत लेखन हर्षाने  शिवछत्रपती नाद घुमतो  हर एक श्वासातुनी पुन्हा जन्मावे राजे तुम्ही या सह्याद्रीच्या कुशीतुनी पुन्हा जन्मावे राजे तुम्ही या सह्याद्रीच्या कुशीतून अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

एक बार कान खोलकर सुन चिन और पाकिस्तान

इमेज
जो उठाएगा भारत माता के आँचल पर आँख खून का कतरा कतरा बहाकर दुश्मन को हम कर देंगे राख चीन हो या  हो ये कायर पाक  तू अपने ओकात में  बुज़दिल जरा झाँक वतन के मिट्टी की खुशबु आती है हमारी सांसों से डरते नही हम ऐसे  गंदे सोच वाले भैसो से ओ तो भाविक थे भगवान के ही पास  चले गए पूरी दुनिया थूकती है तुमपर जो आतंकवादी गोली चला गए हम है इस भारत माता के बेटे एक बार छेड़ी जंग तो पीछे नहीं हटे एक बार कान खोलकर सुन चीन और पाकिस्तान तू कितनी भी कोशिश करले लहराता रहेगा ये तिरंगा निशान लहराता रहेगा ये तिरंगा निशान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी

तोडू नको रे गोड स्वप्न

इमेज

उसवलेल्या नात्यांचे धागे

इमेज
उसवलेल्या नात्यांचे धागे घरट्यातून उडून पिल्लू  आज खूप आलंय दूर पण अजूनही गवसला नाही मला या जगण्याचा सूर बळ दिलत पंखात तुम्ही गगनभरारी घेण्यास  पण पिल्लू ताडफडतय ना पुन्हा घरट्यात येण्यास आई तुझ्या कुशीत फक्त एकदा मला निजूदे  तुझ्या मायेच्या पावसात ओलचिंब भिजुदे बापू तुम्ही पुन्हा  एकदा  माझ्यावर ओरडा माझ्या उज्वल भविष्यासाठीच घसा केलंत ना कोरडा आजीच्या ओव्या आणि गोष्टीने तृप्त व्हायचे कान आता कसं सून सून आहे हे आनंदाचे रान तू आवडीने मला जेव्हा  म्हणायचास  आबा आपल्या भावा भावाच्या नात्याचा गूढ होता गाभा "आजोबा" हा फक्त  शब्दच पडला कानावर  बहिणीच्या नसण्याची अजून खंत आहे मनावर क्षण निघून जातात आणि आठवणी राहतात मागे सांगा ना कसे सांधावेत हे उसवलेले नात्यांचे धागे  अजय दत्तात्रय चव्हाण  उर्फ (राहुल)   *खाकी वर्दीतला दर्दी कवी* मो.8424043233

उतराई

इमेज
🤔 उतराई✍ काहीच उरले नाही  ज्यावेळी आली संधी अशीच उतरली सारी डोळ्यावरची धुंदी।। धुंदीतच होतो मी स्वप्ने होतील साकार मात्र जी केलि मेहनत गेली सारी बेकार।। जे लिहले होते मी जिव सारा ओतून मी मात्र पूरता जळत राहिलो आतून।। सवयच होती मला  आतून जळण्याची अश्रु गळू न देता  हूंदका गिळण्याची।।😪 हूंदका गिळूनच तर  झालो मी कवी या ईश्वरी कृपेची उतराई कशी व्हावी।।🙏�                   अजय द. चव्हाण           उर्फ़ राहुल          खाकी वर्दीतील दर्दी कवी              8424043233 📝

कधी नाही केली वारी पंढरीची

इमेज
कधी  नाही केली वारी पंढरीची ऐक बा विठ्ठला ही हाक अंतरीची तुझ्या विटेवरी  टेकला न माथा काय सांगू पांडुरंगा जीवाची या व्यथा तुझ्या पंढरीचा थाट  पहिला ना कधी सामाविन तुझी मूर्ती काळजामधी     चंद्रभागेच्या तिरी नाही केले स्नान  टाळ मृदंगा संगे व्हावे धुंद मन असा मी अभागी  तुला विनवितो  चला पंढरीला  श्वास हा बोलतो तुझ्या मस्तकीचा  पाहीन मी टिळा भक्तीचा भुकेला भक्त हा भोळा तुझ्या चरणाशी  सांडेन मी श्वास सार्थकी लागेल तेव्हा या जन्मीचा प्रवास शब्दरचना अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233