पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सेवानिवृत्ती समारंभ

इमेज
सेवानिवृत्ती समारंभ लहानपणीच होती खरी शिक्षणाची मजा रे आमचे सर्वांचे लाडके असे सर रवींद्र हजारे इंग्रजी म्हटलं की अंगावर यायचा काटा आपणच खुल्या केल्या आम्हास  भविष्याच्या असंख्य वाटा मुख्याध्यापक म्हणून आज तुम्ही होणार निवृत्त काळीज हलून गेलं सर ऐकून हे वृत्त आपलीशी वाटते अजूनही सर ही रयत शिक्षण संस्था अजूनही कमी झाली नाही अजून न्यू इंग्लिश स्कूल भोळीची आस्था तुमच्या शिक्षणरूपी वल्हयाने आयुष्याची वल्हवली होडी अजूनही आठवते आम्हास हातावरची निरगुडी छडी सारंच आठवतं सर पण बोलवत नाही आता बघा ना थोडा संथ झालाय हा हृदयाचा पाता पुष्पगुच्छ तुमच्या हाती अन टाळ्यांचा गडगडाट होईल बघा सर आता अश्रूंनाही कशी मोकळी वाट होईल पुढील आयुष्यास शुभेच्छा तुम्हास तुमचा प्रवास सुखाचा होवो तुम्ही घडवलेला विदयार्थी सर लाख मोलाचा होवो तुम्ही घडवलेला विदयार्थी सर लाख मोलाचा होवो अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल  खाकी वर्दीतील दर्दी कवी 💐💐💐💐💐💐

स्वप्नपूर्ती

इमेज
स्वप्नपूर्ती आत्तापर्यंत जी रंगविली स्वप्ने पूर्ण सगळी झाली सुख आपोआपच पदरात पडले दुःख जीवणावेगळी झाली तो ससा प्रथम श्रेणीचा मी झालो पारधी अंगात हवी होती  वर्दी अन बायको हमदर्दी जरी स्वप्नांची धाव  क्षितिजाअंती होती सरड्याची धाव कुपणापर्यंत  याची प्रचिती होती कशी सांगू वेदना मनाची थेंब थेंब गाळलेल्या त्या घामाची अशी कृपा लाभली ईश्वराची कुंपणच विसरले मर्यादा बंधनाची ती बंधने तोडून धाव मग क्षितिजाअंती गेली गरुडाच्या पंखांची मग स्वप्नांना गती आली ग्रॅज्युएशन ला प्रथम श्रेणी घेतली अंगात मग वर्दी घातली बायको स्वप्नाहूनही सुंदर भेटली मग स्वप्ने सारी आपलीच वाटली अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8434043233 दिनांक 09/01/2009 सोमवार

तू वात असावी........ मी ज्योत असावं.........

इमेज
जगताना या जीवनी तू वात असावी मी ज्योत असावं खरचं माझं जीवन त्या  पणतीसारखं असावं तू वात असावी मी ज्योत असावं प्रेम म्हणजे तेल असावं मी तुझ्यासाठी जळावं तू माझ्यासाठी जळावं आपलं आयुष्य आनंदाने उजळावं                                            ती प्रकाशाची किरणं                                             हृदयात जात असावी                                   तू वात असावी                                    मी ज्योत असावं आपलं आयुष्य ही मग तेवढंच राहील वात संपून गेली की  ज्योत ही संपून जाईल               ...

कधी चांदण्या रात्रीत.....

इमेज
                      कधी चांदण्या रात्रीत..... कधी चांदण्या रात्रीत  मी एकटाच बसतो कधी तारकांकडे पाहून खुदकन हसतो तर कधी माझ्यातच नसतो निळ्या आकाशी कधी  अगणित तारका मोजतो कधी अश्रूमध्ये चिंब भिजतो एक तारा नकळत तुटत होता कधी अश्रू वाटत होता पण विसरू वाटत नव्हता म्हणे तुटणाऱ्या ताऱ्याला मागितल्यास मनातील इच्छा पूर्ण होते म्हणून मीही डोळे मिटले अन मनात म्हटले जोपर्यंत आहेत चंद्र तारे तोपर्यंत असावे प्रेम सारे चंद्र कधी स्वप्नाच्या ढगाआड लपत होता तर कधी आठवणी जपत होता दिवसा झोपत होता आणि रात्री जागत होता चंद्र असा का वागतो रात्र रात्र का तो जागतो माझंच मुख का तो बघतो कारण...... त्याला देखील तुझाच हाव आहे ओठावर देखील तुझचं नाव आहे जो तुझा तोच त्याचा गाव आहे तो चंद्र म्हणजेच तुझा अजयराव आहे........ अजय द चव्हाण  उर्फ राहुल  खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

गारपीट

इमेज
गारपीट   कष्ट करून घाम गाळून रचतो संसाराची वीट काळजावर घाव तो अवकाळी ही  गारपीट मातीतुन अंकुरलेलं हाती आलं  फळ सोसवेना आता ही अंतरीची  कळ निष्पाप मुक्या पक्ष्यांचे गेले निष्कारण जीव निसर्गाला तरी सांगा त्यांची कशी येईल कीव बरसलेल्या गारांचे  बघताना पांढरेशुभ्र गोळे कुठे लपवावेत सांगा हे रडून सुजलेले डोळे हाता तोंडाशी आलेला घास का हिरावून घेते नियती हिरमुसलेल्या लेकरांची लागेल कोणास हाय ती गारांच्या माऱ्याबरोबर कुटंबाची चिंता मनी घेतलेल्या कर्जाचा  सोडवले का गुंता कुणी डोळ्यातल्या आसवांसोबत उर ही जातो दडपून   कसे जगावे आयुष्य सांगा गारांच्या माराने सडकून कसे जगावे आयुष्य सांगा गारांच्या माराने सडकून शब्दरचना  ✍✍✍✍ अजय द चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

Valentine's Day Special Poem

इमेज
Valentine's Day Special Poem वाटले मनास सहजच थोडं वेगळं करून पाहूया आजपर्यंत जिंकतच आलो प्रेम  आज थोडंस हरुन पाहूया सर्वचजण धरपडतात  प्रेयसीचं प्रेम जिंकण्यासाठी जी मनात दडवली इच्छा ती बोलून दाखवण्यासाठी अस प्रत्येकालाच वाटत आपण I Love You बोलावं तिनं थरथरत्या ओठांन नकळत हो म्हणावं लडिवाळपणे हळूच म्हणावं तिला माज्याहुनही जास्त तूच प्रेम करतेस  मी हरलो प्रीतीपुढे तुझ्या तूच अजिंक्य ठरतेस कधी मी कधी तिनं  प्रकट केलं प्रेम दोघांनीही जीवापाड सरसकट केलं प्रेम शब्दरचना  ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

गगन भरारी

इमेज
       3 फेब्रुवारी 2018 रोजी कोरेगाव येथील जायगाव चे सुपुत्र आणि भारतीय वायुसेनेत कार्यरत असताना  शहिद झालेले जवान घनश्याम शिंदे यांना श्रद्धांजली म्हणून माझी ही कविता अर्पण.....                                 गगन भरारी समंदर से गहरी आसमान से ऊंची हर एक उड़ान थी उनकी आम आदमी के दिल को छू ले ऐसी सपनोंकी चढ़ान थी उनकी हवा को कैद कर ले मुट्ठी में ऐसा वीर था जायगांव का पानी फाउंडेशन के लिये करता काम नाम था एक ठंडी छाव का आंखों से समंदर उतरे और ओठोंसे  अमर रहे घनश्याम शिंदे सलाम लाख लाख बार इन्हें कोरेगांव भूमि के ये जांबाज बंदे नाम ही है उनका आकाश से इस तरह था ऐसे जुड़ा ऐसी भरी आखरी उड़ान हर एक दिल  रो कैसे पड़ा हर एक आँख का आंसू पलकों में ऐसे सिमटा तिरंगे के तीन रंग में वीर का बदन लिपटा 🇮🇳जय हिंद🇮🇳 शब्दरचना ✍✍✍✍✍ अजय द चव्हाण उर्फ राहुल  खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233
इमेज
महाशिवरात्री को जन्मी ये मेरी नन्ही सी गुड़िया को पांचवे जन्मदिन पर एक छोटीसी भेट...... *जन्मदिन की शुभकामनये अनुष्का* शिवा की शिवानी है या है तू महाकाली  बेटीया तो होती है खुशियोंकी दिवाली तू इस संसार की  है अनोखी शक्ति काँच से भी नाजुक ऐसी  मेरी गुड़िया लगती तेरी आँखों की चमक और होटो की हँसी गले लगाने से  मिलती है  जहा की हर खुशी तूने कदम रखा धरती पे ओ महाशिवरात्री का दिन था मेरी मन्नत पूरी करनेवाला ओ कोई जादुई जिन था तेरे नन्हे से पैरोंको चूमा था बड़े प्यार से ये  कम नही था मुझे  किसी भी त्योहार से तुझे गौरी पुकारू या अनुष्का ही है सही धड़कनोंको जिंदा रखे  ऐसी जादू की छड़ी कही अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8434043233

सांग कधी येशील......

इमेज
सांग कधी येशील..... प्रेमाची दिव्य ज्योत बनून सुखाची पंचारती ओवाळीत आनंदाची उधळण करीत अनावर भावना पुशीत माझ्या सांग कधी येशील कुशीत माझ्या आतुरलेल्या नायनांना सुखावत नायनातील नयनात बोलत नायनांना पाझर फोडत अश्रू बनून नजरेत हासत सांग कधी येशील गाली माझ्या काळजाचे ठोके चुकवीत स्वतःचे अस्तित्व विसरीत मनाचे तार छेडीत धडकन एक बनूनी सांग कधी येशील हृदयात माझ्या काळोख्या रात्रीला जागवत पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात गुलाबी थंडीत मनाशी बिलगत पहाटेच्या दवबिंदुप्रमाणे  सांग कधी येशील स्वप्नी माझ्या नजरेला नजर भिडवत स्पर्शाचा सुगंध दरवळत ओठातील अमृत घेऊनी श्वास एक करीत स्वतःला माझ्यात हरवत सांग कधी येशील मिठीत माझ्या चिमुकल्याचे स्वप्न रंगवीत हर्षाचे तुषार उडवीत संसाराचे सप्तरंग फुलवीत इंद्रधनुष्यी कमान बनून सांग कधी येशील जीवनी माझ्या सांग कधी येशील जीवनी माझ्या अजय दत्तात्रय चव्हाण  उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

आला आला 6 मार्च

इमेज
*SRPF वर्धापन दिन* आला आला  6 मार्च  आम्हाला वर्धापन दिनाची आच रूबाबदार चालतो आम्ही  लावून जमिनीवर टाच नजर आमची समोर आणि हाताची स्विंग असते बाकी सगळे बघे अन तुकडी किंग असते रणांगणात हि नेहमी  असतो आम्ही सतर्क दुश्मन हि लावू शकत नाही आमच्या योजनांचा  तर्क निशाण आमच्या समोर आणि सलामी शस्त्र असते नजर दिपवून टाकेल असे अंगावर वस्त्र असते करताना हर्ष फायर सन्मानाने पाहतो आपले सर्वस्व तो खात्यासाठी वाहतो तिन्ही लोकी झेंडा आमचा अन मान असते ताठ  नोकरी खडतर आहे ही  संकटाशी असते गाठ  कधीच आम्ही  आमचा  विकला नाही इमान म्हणूनच सुंदर होत गेली आमच्या शिस्तीची कमान SRPF जवान असल्याचा बाळगतो आम्ही गर्व नाव उज्वल करू खात्याचे मिळून आम्ही सर्व 👆👆👆👆 अजय द चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

माय मराठी

इमेज
माय मराठी ही माती मराठी ही नाती मराठी विश्वात ही गुंजते ही ख्याती मराठी ही नाळ मराठी ही बाळ मराठी अस्मानीही झेंडा रोवतो हा काळ मराठी हा साद मराठी हा नाद मराठी ही मादक रसाळ स्वाद मराठी ही माय मराठी ही ताय मराठी स्पंदनातूनही उतू जाते ही साय मराठी ही जान मराठी हे ज्ञान मराठी विश्वातही हिला असा मान मराठी ही ओढ मराठी ही खोड मराठी अमृताहून ही अशी  माझी गोड मराठी अजय दत्तात्रय चव्हाण *खाकी वर्दीतला दर्दी कवी* मोबाईल नंबर 8424043233

मझ्याच नशिबी यावे हे असेच का रे......

इमेज
माझ्याच नशिबी यावे हे असेच का रे माझ्याच नशिबी यावे हे असेच का रे तुझ्या कुशीतच माझे फुलती सुख पिसारे सारे इथेच आहे  जशेच्या तसे तुझा विरह म्हणजे जणू काटेरी फासे                                  या काटेरी फास्यांचे                              होतील का तारे                                   माझ्याच नशिबी यावे हे                               असेच का रे....... फडफड करते आज  माझी डावी पापणी नकळत ये तू असा माझ्याच स्वप्नी                          लाभुदे स्वप्नांना                         थंड...

स्वर काळजीचा

इमेज
                            स्वर काळजीचा                      कर्तव्यासाठी जागरूक ते                      तसेच कुटुंबासाठी ही असतात                      एक नवरा म्हणून आईसाठी                      वडील म्हणून आमच्यासाठी असतात                       आम्ही शाळेतून यावं आणि                       त्यांनी उचलून घ्यावं कवेत                       असे पप्पा देवा आम्हाला                       जन्मोजन्मी हवेत                      ...

सल मनातील

*सल मनातील* खुल्या मनानं पहिल्यासारखी प्रतिसाद देत नाहीत लोकं  स्वतःच्याच पोस्ट मध्ये आजकाल Busy त्यांचं डोकं सर्वच सोडून देण्याच्या नादात चांगल्या पोस्ट ला मुकता तुम्ही काय तरी फालतू असेल म्हणून तुच्छ नजरेनं बघता तुम्ही कधी आई कधी वडील तर कधी शहीद जवानांची असते गाथा तुमच्या पर्यंत पोहचचाव सर्व म्हणून रोज झिजतोच ना स्वतः हृदयात उतरेल तुमच्या आत दबलेला हा आवाज आणि शब्दांनी सजवलेला हा कवितेचा सुरेख साज वाचणारे आवडीने वाचतात त्यांचे रिप्लाय ही असतात मस्त बाकीच्यांना मात्र त्याच काहीच सोयर सुतक नसतं राहा कोणत्याही ग्रुप मध्ये मात्र या हृदयाशी राहा संलग्न चार ओळीत कधीतरी माझ्या भान हरपून राहा मग्न ✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

श्रद्धांजली

इमेज