पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Vinayak kalokhe ,Pune

 ऑनलाईन ज्यांनी ज्यांनी चारोळीसंग्रह बुकिंग केला होता त्या रसिक मित्रांपैकी *माझ्या नूतन चारोळीसंग्रहासोबतचा पहिलाच फोटो सोसिएल मीडियाद्वारे माझ्या पर्यंत पोहचला तो म्हणजे पुणे येथील विनायक काळोखे यांचा...*  चारोळीसंग्रहाबद्दल त्यांना किती ओढ होती आणि वेळेआधी त्यांच्या हाती चारोळीसंग्रह पडल्यावर त्याचा आंनद त्यांनी स्वतःच्या  शब्दात व्यक्त केला यावरून आपणास त्याची प्रचिती येईलच... *संग्रह  बुक  केला  तेंव्हा  डिलिव्हरी  23 किंवा  24 तारीख  सांगितली  होती  मात्र  माझी  इच्छा  होती  कि  22 तारखेला  यावा  आणि  माझी  इच्छा  पूर्ण  झाली  कारण  आमच्या  सहजीवनाला  आज  34 वर्षे  पूर्ण  झाली  आणि  त्याची  आठवण  आपल्या  या  पुस्तकाच्या  रुपणाने  जतन करून  ठेवणार...*       .......विनायक काळोखे ,पुणे.

CHandu sonawane Pune

 *खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या लेखणीतून हा चारोळीसंग्रह*  (अजय दत्तात्रय चव्हाण सर लिखित)आत्ताच माझ्या हाती आला खरंच खूप छान आहे सर आणि *मला फ्रंट कवर बघूनच खूप आनंद झाला*  मला माझी खात्री आहे की मी एकही चारोळी न सोडता संपूर्ण चारोळीसंग्रह वाचून काढेन आपल्या चारोळीसंग्रहास खूप खूप शुभेच्छा सर 😊💐🤗.              *.....चंदू सोनवणे CPR पुणे*

Pradnyesh Yaswante Mumbai

 *तो कोणी मोठा साहित्यिक नाही समीक्षक ही नाही परिस्थिती अत्यंत हालाखीची बघितलं तर कॉलेजचं पोर* मात्र एखाद्या नावाजलेल्या समीक्षकाला ही लाजवेल इतकी सुरेख समीक्षा माझ्या नूतन चारोळीसंग्रहाची केली आहे *एक सच्चे पोलीस मित्र तसेच दर्दी कवीचा सच्चा रसिक मित्र प्रज्ञेश यशवंते याने......* जय हिंद सर                    , काल आपला खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या लेखणीतून हा चारोळी संग्रह मला ऑनलाईन फ्लिपकार्ट वरून घरपोच मिळाला  आपला चारोळीसंग्रह मिळाल्यावर मला खूप  आनंद झाला  गेले 4 ते 5 दिवस मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण काल आला   फार उत्सुकता होती मला  चारोळी संग्रह वाचण्याची  दर्दी कवीने लिहिलेल्या  ह्या सुरेख सुंदर शब्दांची  चारोळी संग्रह हाती आल्या आल्या सगळ्यात आधी माझी नजर पडली ती मुखपृष्ठावर लिहिलेल्या चारोळीवर  कुठलंही चांगलं कार्य करताना अनेक माणस आडवी येतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपली चारोळी फारच योग्य आहे असं मला वाटत  चारोळी संग्रहातल्या आपल्या उत्तम चारोळ्या वाचून फारच छान ...

Dattatray Gore,Satara

 *🌹🌹प्रिय कविवर्य अजय भाऊ* काल आपला खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या लेखनीतुन हा चारोळीसंग्रह दहा दिवसाच्या प्रतिक्षेनंतर हाती मिळाला आणि प्रथम मुखपृष्ठा वरील चारोळीवर नजर पडली व तडफदार व्यक्तिमत्व अर्थात खाकी वर्दीतील दर्दी कवी"अजय भाऊ...चारोळी संग्रहातील विवीध विषया वरील चारोळ्या खुपच छान व प्रेरणादाई आहेत .असेच आपल्या कलेचा आस्वाद आम्हाला मिळत राहो,आपले लिखान करत रहा छान वाटते,आपण आपली कला आपले पोलीस कर्तव्य घरदार सांभाळुन करता याचा मनोमन अभिमान वाटतो, आपल्या चारोळीसंग्रहास  खुप खुप शुभेच्छा... 🌹🌹🌹🙏👍     *.......दत्तात्रय गोरे ,सातारा*

Mahesh falle Satara....

 आपला चारोळीसंग्रह मिळावा म्हणून जीवाचं रान करणारे असेही सच्चे रसिक मित्र...  *लॉकडाऊन असून सुद्धा मी खास आपला नूतन चारोळीसंग्रह मला मिळावा यासाठी पास काढून तुमच्या गावापर्यंत आलो*  तसं तर पुस्तक वाचण्याचा योग मला कधी आलाच नाही आपली ओळख सर अमर मोळावडे (फोर्स वन कमांडो) यांच्यामुळे झाली आपल्या चारोळ्या रोज ग्रुप वर पाहतो, वाचतो त्यातून तुमच्या पुस्तकाची आवड निर्माण झाली नक्कीच सर मी आपले पुस्तक वाचेन आता लॉक डाऊन पडला आहे अशीच अजुन पुस्तके आमच्या हाथी पडोत आणि ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळत राहो ह्याच शुभेच्छा....💐 आपण आपल्या गावी नसतानाही मला आपले पुस्तक भेटले पुन्हा कधी योगायोग आला की नक्कीच आपली भेट घेईन सर ..... 🙏🙏🙏        *....महेश फल्ले कराड, सातारा*

Deshmukh sir Ptc Marol

 *आमच्या पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ,मुंबई चे वरिष्ठ श्रेणी लिपिक श्री गणेश देशमुख सर यांनी कवीला कवीच्या भाषेत दिलेले उत्तर नक्किच आपणास मंत्रमुग्ध करून जाईल सरांनी नूतनचारोळीसंग्रहातील प्रत्येक सदर आणि सदर त्यांच्या लेखणीतून इतक्या सुरेखपणे फुलविले आहे की वाचणाऱ्याचे मन प्रफुल्लित होऊन जाईल...👍* *खाकी वर्दीतील दर्दी कवींच्या चारोळी संग्रहाला प्रतिक्रिया चारोळीच्या माध्यमातून*_ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 1️⃣  सुरुवात होते आपली,  *शहिदांना मानवंदनेपासून* ... देशभक्ती जागी होते, मन गाभाऱ्याच्या आतून... 2️⃣ उडवतात कल्पनांचे घोडे,  *चिरतरुण चारोळ्या* ... भावतात कोणत्याही वयाच्या मनाला, उडालेल्या तरुणपणाच्या पाकोळ्या... 3️⃣  *प्रेमाच्या* विश्वात शिरताना,  आनंद खूप होतो...  *कोसळणाऱ्या पावसाचं* वाचताना मात्र,  मध्येच खूप त्रास होतो... 4️⃣ प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला असतो, कधी ना कधी *विरह* ... वाचत असताना हा भाग, समजतच नाही कधी होतो कलह... 5️⃣  कठीण असतात आयुष्यातील, बरेच सारे प्रसंग... त्यातून सावरण्यासाठी नक्कीच, उपयोगाचा ठरेल *प्रेरणादायी चारोळ्य...