पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अजिंक्य राऊत

इमेज
  * खटाव गावचे सुपुत्र शहीद जवान अजिंक्य राऊत यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 *             * वीरमरण * वीरमरण आले त्यांना बजावताना देशसेवा असा पुत्र प्रत्येक मातेच्या पोटी जन्मा यावा धन्य झाली तिची कुस डोळ्यात टिपूस ही नसेल देशाच्या कामी आला पुत्र चेहऱ्यावर अभिमान दिसेल देशसेवेसाठीच झिजवली त्याने आयुष्यभर काया शूरवीरांची भूमी ती बलिदान जाईल कसे वाया तिच्या कुंकवाचे जरी पुसले गेले सूर्यबिंब लेकराच्या डोळ्यात पाहीन ती त्याचेच प्रतिबिंब नाव त्याचे अजिंक्य तो अजिंक्यच राहील हृदयात लाखो सूर्य मावळतात एका शूरविराच्या उदयात तिच्या पोटात वाढतोय अंश त्याच्याच रक्ताचा अभिमान बाळगतो आम्ही नेहमी शहीद या तख्ताचा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

वडापाव दिन

 #जागतिक_वडापाव_दिवस  खमंग सुवास जणू भुरळ घालायचा मनाला खरं खरं सांगा वडा पाव आवडायचा कोणाला वडिलांनी दिलेले पैसे  ठेवायचो आम्ही जपून भूक लागली की वडापाव मग हळूच खायचो लपून वडापावचा स्वाद दिवसभर रेंगाळायचा जिभेवर बहिष्कार टाकावा तरी कसा सांगा मित्रांच्या सभेवर गरमागरम वडापाव सोबत मिरच्या हव्यातच तळलेल्या आठवतात पुन्हा पुन्हा त्या मैत्रीच्या गाठी जुळलेल्या एकटा एकटाच हातात असतो वडापाव धरून कॉलेजचे ते दिवस पुन्हा सांगा येतील का फिरून ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

निरोप समारंभ

 *निरोप समारंभ* काय बोलावे ते मला आता काहीच कळत नाही तुमच्या आठवणींचा सूर्य मनाआड का ढळत नाही थोडा आनंदाचा आणि थोडा क्षण हा दुःखाचा इथून पुढचा प्रवास तुमचा नक्कीच होईल सुखाचा तुम्ही सोडून चाललात याचे दुःख नक्कीच आहे मनी मन गहिवरते आमचे अन डोळे पाणावतात या क्षणी तुमच्या विना जिवलग आम्हास इथे दुसरे कोणीच नसे पिटीसीच्या मातीत दिसतील तुमच्या अस्तित्वाचे ठसे भारावलेल्या मनानी आम्ही आज निरोप देतो तुम्हास फक्त हृदयात तुमच्या नेहमी जागा असावी आम्हास ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रत चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

खाकी वर्दीतील दर्दी कवी..

इमेज
 

दहीहंडी

इमेज
 #यंदाची_दहीहंडी* फोडली असती हंडी आम्ही चढवून थरावर थर भारतात कोरोना हा आलाच नसता तर बालगोपाळांची फ़ौज घेऊन गल्लोगल्ली फिरलो असतो फोडुन मनाची दहीहंडी विजयी ही ठरलो असतो कोसळणाऱ्या पावसात  झालो असतो ओलेचिंब गोंडस लेकरात पाहिले असते  नंदलालाचे प्रतिबिंब ढोल ताशांच्या गजरात दुमदुमले असते आकाश डोळ्यासमोर चित्र फक्त मन मात्र आतून भकास एकजुटीने सगळे मिळून करू कोरोना वर सरशी यंदाची कसर सारी आपण भरून काढू पुढच्या वर्षी ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

महापूर

इमेज
  सांगली ,कोल्हापूर पुरस्थितीवर लिहलेली ही खाकी वर्दीतील दर्दी कवीची सुरेख रचना...... *आवडल्यास शेयर करायला मात्र विसरू नका....* *माणुसकी* जरी झाले जलमय सारे  सांगली अन कोल्हापूर इथेच गवसला खरा सर्वांना माणुसकीचा तो मधुर सूर महापुराचे पाणी जसजसे चढू लागले अंगण दारी प्राणाचीही पर्वा न करता धावून आले ते वर्दीधारी जिवात जीव आला त्यांच्या अश्रूंचाही मग फुटला बांध आपआपसात द्वेष कशाला ही माणुसकीच जरा सांध कंठात प्राण आणून सर्वजण  बसले होते ती आस लावून माणसेच माणसांच्या मदतीला अश्या पुरस्थितीत आली धावून माणसाने माणूस जपा तुम्ही हीच तर खरी आपली संपत्ती तेच करतील रक्षण प्राणांचे कसलीही असो नैसर्गिक आपत्ती माणुसकीचे घडले दर्शन  विसरून सर्व  धर्म -जात अश्रू पुसण्या त्यांचे आता पहा सरसावले सारे हात देव ,धर्म अन जात- पात यात राहू नका अडकून माणसेच येतील मदतीला हेच सांगणे माझे कडकडून ✍✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

ऑनलाईन प्रेम

इमेज
  #ऑनलाईन_प्रेम संध्याकाळचा सूर्य जेव्हा ढगाआड जायचा कलून ऑनलाईन प्रेम त्यांचं यायचं हळूच फुलून चॅटिंग वर चॅटिंग आणि कटिंग वर कटिंग असायची तो ऑनलाईन दिसला की ती हळूच गालात हसायची प्रेमाचं धुणं  ते दोघे बसायचे रात रात धुत आणा भाका शपथांना तर नुसता यायचा उत रिचार्ज तिचा मारता मारता त्याच्या नाकी यायचे नऊ नको करूस काळजी तू आपण एकमेकांचे होऊ सोना बाबू पिल्लू अजून काय काय असायची विशेषणे प्रत्यक्षात न भेटता ही त्यांची एकेमकांत गुंतायची मने मनाशी त्याने घट्ट ठरविले तिला हृदयात करायचं लॉक एक दिवस मात्र तिनेच  त्याला करून टाकले ब्लॉक ऑनलाईन प्रेमाचे शेवटी असेच वाजतात तीन तेरा दुसऱ्यासोबतच मारला तिने तिच्या सातजन्माचा फेरा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

भाऊ बहीण

 #रक्षाबंधन भावाने बहिणीची  करावी रक्षा जशी आयुष्यभरासाठी घेतलेली दिक्षा बहिणीने भावाला  पंचारतीने ओवाळावे जगातील सारे सुख बहिणीला मिळावे भावाने बहिणीचे  करावेत खूप लाड भाऊ म्हणजे जसे एक आनंदाचे झाड भावाने बहिणीला काटा टोचू देऊ नये दुःखाची फुले तिला कधी वेचू देऊ नये भावाने बहिणीसाठी शोधावे सुंदर घर जिथं प्रेम देणारी माणसे असतील आयुष्यभर भावाच्या भाळी बहिणीने लावावा केशरी गंध पवित्र असे ते जन्मोजन्मीचे बंध ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

रक्षाबंधन

 #अगर_हमारी_भी_होती #प्यारी_सी_एक_बहना छुपके से आती ओ और खुशी का तोहफा देती  हम गुस्सा करते उसपे और ओ खफ़ा होती मनाने उसे हम फिर करते हर वो कोशिश उसकी पलको में फिर झुकाते अपना शीश  ओ मुस्करा देती गालो में और हमरा दिल जीत लेती काश राखी बंधवाने हमे हमारी भी बहना आती हम भाई का ओ प्यार बहना की आंखों में देखते उसकी मासूम छबी को दिल की किताब में रखते ये जिंदगी बता हमे तू  कोनसे मोड़ पे ले आई हर रक्षा बंधन को हमारी सुनी सुनी रहती कलाई हम भी बुन लेते शायद सपने हमारी पलकों पे गले लगाकर फूटफूटकर रोती वो भाई को बिदाई पे ✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233