*एक संघर्ष जगण्याचा*

*एक संघर्ष जगण्याचा* सामर्थ्याची तलवार ती संयमाची मूर्ती आहे संकटानाही लाजवेल अशी आत्मशक्तीला भर्ती आहे डोंगरएवढं दुःख नशिबी पण चेहऱ्यावर हास्य होतं नियतीलाही न उलगडणारे एक गूढ रहस्य होतं कॅन्सरशी लढताना तिने सोडली नाही जिद्द ओलांडेल तरी मृत्यू कसा तिच्या संघर्षाची हद्द एक महिन्याचं लेकरू तिनं नंदेच्या हाती सोपवलं दुःख काळजातल सांगा तीनं श्वासात कसं खपवलं यशस्वी केला खंबीरपणे तिने दोन वर्षांचा कॅन्सर लढा झिरपणाऱ्या अश्रुंमागे पती शिंपत होता ना आधार सडा नाव ममता आहे तिचं पण हृदयावर पाषाण ठेवला आदर्श घ्यावा जगण्याचा असा संघर्षझेंडा तिने रोवला शब्दरचना अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 842404323 3