पोस्ट्स

जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओढ मातीची

इमेज
नीरा नदीच्या कुशीत लपलेलं सातारा पुणे जिल्ह्याची सीमा असणारे वीर धरणाच्या उदरात सामावलेलं एक छोटंसं सुरेख गाव ( भोळी ) एका सुरेख क्षणी टिपलेलं हे भोळी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे छायाचित्र ⛳ आणि याच निरामाई ला उद्देशून माझी ही कविता जन्मला असा हिरा  तुझ्या काठावरती नीरा तुझ्या अथांग पात्रात सामावून घे  हा जगण्याचा पसारा तुझ्या सान्निध्यात मला  पुण्य मिळत सात जन्माचं सार्थक वाटत मला  या भूमीत केलेल्या कर्माचं जशी लक्ष्मी माझी आई तशी  तू हि माझी आई आहे तुझ्या सान्निध्यात येण्याची  मलाही  घाई आहे लक्ष्मी आईच्या कुशीतून जन्मलो  शेवटी तुझ्याच उदरात यायचंय दोन्ही आयांशी जोडलेलं नातं  जगात अजरामर ठेवायचंय गाव माझे मानेकॉलनी पोस्ट माझे भोळी  कधीच रिकामी ठेवली नाहीस तू माझ्या आयुष्याची झोळी अजय द चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

|| बेटी ||

इमेज
|| बेटी || मेरे दिल कि नन्ही गुडीया सी है वो मेरे अंगण कि प्यारी चिड़िया सी है वो  उसका भोलापन हर पल दिल को लुभा जाता है उसको देखते ही न जाने जिंदगी का  दुःख कहा चला जाता है उसकी मासुमियत दूर करती है  मेरे आंखो कि थकावट बेटी तो घर कि लक्ष्मी होती  है  ये सच्ची हैे कहावत उसकी निशानीयों को क्यो  अंधेरे मिटा देते है लोग जिसकेआने से तो पुरे  होते है ये चारो धामों के भोग अजय तो यही कहता कि  क्यो मिटा देते है मासुम कालियो को  इस दुनिया मे आने से पहले बेटा बेटी एक समान ये बात  एक बार अपने दिल से कहले  सुनो सब अजय कि ये बात बेटा ही चाहिये जिद्द करने वाले बेटे से भी बेहतर सजायेगी    ये तुम्हारे जिंदगी के मेले ✍�✍�✍�✍� अजय द चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मुंबई 

घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा......

इमेज
घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा तू वाटे मज जवळी मग ती ओढ कसली कळी मनीची गोड हसली नकळत ती काळजात घुसली घुसुनी मग ती अशी खुलली दुरी अंतराची का ती भुलली याची वाच्यता ना कोणा.....                 घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा तो मस्त गंध प्रीतीचा वाढवती हर्ष पतीचा घट्ट तो बंध मिठीचा मधुर तो स्वाद ओठीचा मज प्रीतीचा खेळ जुना                घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा कधी ओठांशी छेडले कधी नयनांशी भिडले मनी अजूनही गुपित दडले स्वप्नी नव्हते ते ही घडले घडावा फिरुनी तोच गुन्हा             घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा तू अंतरीची आस पाही  हा मनीचा भास नाही तुजवीण मज कोण खास नाही ना हृदयातील श्वास काही मी खुळी की खुळी प्रीत म्हणा            घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा शब्दरचना ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

चटकदार चारोळ्या

इमेज
                      1) तुला भेटून आल्यावर      उदास होतं मन आणखी      तुझ्याविना तूच सांग      जिवलग कोण आणखी                                 2) लाडात येताना तू कधी                                     अशी गोड लाजून जाते                                      न पिताच चढते मला                                       नयनांनी अशी पाजून जाते 3) मी कधीच रडले नाही      मला आपोआपच भरून येतं      तुमच्या विरहाच दुःख      थेंबाद्वारे सरून जातं         ...

ओझं आनंदाचं

इमेज
*ओझं आनंदाचं* बेरंग होतो आज मी रंगात रंगून देखील कोडं पडलं असं मनातलं सांगून देखील मजवरी असे उडाले  तुझ्या प्रीतीचे रंग न खेळून देखील होळी भिजले माझे अंग मनही रंगले  मी ही रंगलो तुझ्या होकारास्तव पुन्हा जगलो थोडं तू थोडं मी रंगवलं असं ओझं आनंदाचं आज वागवलं कसं आनंद ही आज मला वाटला मनाचं ओझं इतर दिवशी सोबतीला दुःखच असतं माझं अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल  खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

प्रिये जिंकलस तू मला...

इमेज
                          प्रिये जिंकलस तू मला खरंच एवढ्या दिवसातून  आज सुंदर वाटली ती का कुणास ठाऊक हृदयाच्या अंदर वाटली ती तिचा तो साज शृंगार पाहून  खरच मन भारावून गेलं तुझ्यासारखी बायको मिळाली लय भारी नशीबच सालं का कुणास ठाऊक आज फिकी वाटली तुझ्यापुढे नटी सामावून तुला श्वासात  बंद केली काळजाची पेटी धस्स करून गेलं काळजात तुझं ते नाजूक हास्य  आज उलगडलं मला तुझ्या सौंदर्याच रहस्य तुझी ती मनमोहक अदा अन घायाळ केलंस मला तुझ्या लोभस लाजण्याने प्रिये जिंकलस तू मला अजय द चव्हाण उर्फ (राहुल) *खाकी वर्दीतील दर्दी कवी* 8424043233

कधी संपती हे दिसे

इमेज
                             *कधी संपती हे दिसे* कधी संपती हे दिसे मन ही झाले वेडेपिसे क्षणही तो युगासम भासे तुजविण जगण्या आस नसे पाच मासाचा वनवास घडता घरे हृदयी सोबत सोडता विरघळले अश्रूसवे वचन तोडता दुःखी पिंजऱ्यात काळीज कोंडता तुजविण असे मी निराधार तव आठवणींचा मज आधार स्वप्नाच्या घोड्यावर मी स्वार कीती वेदना तरी न हार मज स्वप्न ते स्वप्नच वाटे घायाळ करिती विरहाचे काटे मज स्वप्नांची ती पहाट कोठे स्वप्नांहून भासे हे बंध मोठे पहिल्या मिलनाचा जो गंध जाणवे श्वासातून तो सुगंध त्या नशेत व्हाया धुंद कधी रे संपशी हे द्वंद्व  अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233 ✍✍✍✍✍

बंदिवान मी या संसारी

इमेज
बंदिवान मी या संसारी बंदिवान मी या संसारी तुझवीन क्षण विषारी पीत असते काळीज भारी माझीच मी होते वैरी तुझवीन मी काही नाही होई अंगाची लाही लाही मनात येते काही वाही तुही का ते दुरुनी पाही मना लागला तुझा लळा तुझ्या संगतीचा नाद खुळा तुझा तो अल्लड चाळा कशी विसरू माझ्या बाळा कधी न स्वप्नात वाटले जे नको ते दुःख भेटले तेव्हा प्रेम मनास पटले अन नयनी अश्रू दाटले उरली ती इच्छा मनी नाही आता माझे कुणी वाट पाहते प्रत्येक क्षणी तुमची आवडती चिमणी ✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :- 8424043233

Happy Makar Sankrat

इमेज
                        मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा   तिळगुळ घ्या आणि          बोला असचं गोड               अशीच घट्ट राहुद्या ही                          नात्यांमधील ओढ   नात्यांमधील ओढ ही          त्यास हृदयाची असते हाक                 मनातील मस्तर द्वेष तू                        मायेच्या स्पर्शाने झाक  मायेचा स्पर्श होईल अन         पुन्हा हळुवार उमलेल नातं                   या नात्यांसाठीच बघा मग                          मन आवडीनं कसं धाव घेतं   धाव घेणाऱ्या मनास या           ...

लावणी

इमेज
                                      लावणी *तुम्ही म्हणता ओ वन्स मोअर* तुम्ही म्हणता ओ वन्स मोअरं माझ्या जीवाला लागतो घोर..... मी नाचून थकले बाई तुम्हा येतो हो आणखी जोर... मी अशी नजरेची जादू दावली माझी अदा तुमा का हो भावली त्याचे असे ग हातवारे  मी विसरून जाते सारे शीळ वाजवी नाजूक अशी  माझ्या दिलाचा हाय तो चोर तुम्ही म्हणता ओ वन्स मोअरं माझ्या जीवाला लागतो घोर..... सारखा तुमचा हो वन्स मोवरं नाही थकायची मी तोवर अशी इश्काची जादू माझ्या तुमा करायची नाही बोअर तुम्ही अस बघा थोडी द्या हो जागा तुमच्या हृदयी खोलवर  तुम्ही म्हणता ओ वन्स मोअरं माझ्या जीवाला लागतो घोर..... तुम्हा खुणवते मी बाई माझ्या मनात आहे काही अस मनातलं अस स्वप्नातलं  येउद्या ओठावर तुम्ही म्हणता ओ वन्स मोअरं माझ्या जीवाला लागतो घोर..... मी ल्यायले देखणा साज तुम्हासाठीच नटले आज मी तोडले लाजेचे घुंगरू शाल प्रीतीची तुमच्या पांघरु आता नका हो नाही म्हणू मी जाहले तुमची ज...

गुरू वंदना व माजी विद्यार्थी संमेलन

इमेज
*गुरवंदना व माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन* जिथे आम्ही घडलो ती आज पुन्हा दिसणार शाळा काय बोलावं काही सुचेना दाटून आला गळा तुम्ही दिलेल्या शिक्षणाची शिदोरी आयुष्यभर ही नाही सरत कपाळी लावावी पायधूळ तिथली असे हे आपले विद्यालय नवभारत भेटण्या आतुर झालेल्या जीवास तुमचे प्रेमाचे शब्द सुखावतील भूतकाळात विरून गेलेल्या आठवणी इतक्या वर्षांनी पुन्हा फुलतील विखुरलेले मित्र भेटतील आनंदाला येईल उधाण गुरूवर्यांच्या चरणस्पर्शाने उजळून निघेल ही हृदयाची शान शिक्षकरुपी अमृतधारेने भागविली आमच्या शिक्षणाची तहान तुम्ही शिकवा आम्हाला अन पुन्हा होऊ आम्ही लहान माजी विद्यार्थ्यांचा सोहळा हा मात्र आनंद तुमच्या मनात असेल तुमची जागा आयुष्यभर गुरुजनहो या हृदयाच्या पानात असेल तुमची जागा आयुष्यभर गुरुजनहो या हृदयाच्या पानात असेल शब्दरचना अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

शाळा मुलांची

* शाळा मुलांची * अशी शाळा आपली चंद्राच्या कुशीत लपली करून अभ्यास सारा मुले थकून झोपली फुले शिकवती शाळा फुलपाखरे गाती गळा उन्हाने माती तापली फुलांनी नाती जपली चला फुलासांगे गाऊ फुलपाखराचे रंग घेऊ माझा रंग पिवळा तुझा रंग लाल घालू मस्ती अन करू धमाल अजय द. चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी ✍✍✍✍✍ 8424043233

तू येशील ना नक्की...

इमेज
तू येशील ना नक्की..... तू येशील ना नक्की..... डोळे लागलेल्या वाटेवरून विरहात उसळलेल्या भावनांच्या वाटेवरून तू येशील ना नक्की..... तुझी वाट पाहताना या भिजलेल्या अश्रूंसोबत तुझ्या स्मृती वाहताना तू येशील ना नक्की..... त्या भारल्या क्षणात सुगंध श्वासातील देण्या या काटेरी वनात तू येशील ना नक्की..... मी सांगेल तेव्हा प्रीतीचा वसंत हा असा फुलतो जेव्हा तू येशील ना नक्की..... स्वप्ने मुठीत घेऊन सुखवशील आसुसलेल्या जीवास असाच मिठीत घेऊन अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल  खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233 ✍✍✍✍✍

🌹शब्दफुले🌹

इमेज
                              🌹 शब्दफुले🌹                             काय लिहावं आता                             मला समजलं नाही                             शब्दांचं फुल मात्र                              अजून कोमेजल नाही                            कोमेजतील तरी कशी ही                            नाजूक शब्दफुलें                             सुगंध त्यांचा मनात                ...

शिकवण आजीची

इमेज
शिकवण आजीची

जाती भेद विरहित जगणं

इमेज
                       जाती भेद विरहित जगण                        माणूसच माणसाचा असा                        का करतो  घात                        सांगा ना सांडलेल्या रक्ताची                        कोणती असते जात लहान होतो तेव्हा कधी उमगली नाही जात पण शिंगे फुटली अन हळूहळू जात टाकू लागली कात                      एक माणूस म्हणून जगण्याचा                       करताना जीवतोड संघर्ष                       कुठून झाला हा जातभेदाचा                      किळसवा...

अशी एक असावी कविता..

इमेज
                     अशी एक असावी कविता...               अशी एक असावी कविता.. ...                           पावसाच्या पहिल्या सरीमध्ये                           चिंब भिजणारी                           निळाभोर पिसारा फुलवत                          आनंदाने नाचणारी                अशी एक असावी कविता.. ...                           मनाला स्पर्शून                          हृदयात राहणारी                       ...